ETV Bharat / state

एकी असावी तर अशी : ५० वर्षांपासून बाणगाव ग्रामपंचायत बिनविरोध - Bangaon Bk gram panchayat election Unopposed news

नांदगांव तालुक्यातील बाणगाव बुद्रुकचा गेल्या 50 वर्षांपासून तर विभक्त झाल्यानंतर बाणगाव खुर्दचा 30 वर्षांपासून बिनविरोध निवडीचा इतिहास असून या दोन्ही गावांत कुठल्याही प्रकारची बोली न लावता जेवढ्या जागा तेवढेच सदस्य उभे करायचे आणि गावातील सर्वांना विश्वासात घेऊन निवडणूक बिनविरोध करायची परंपरा अविरत कायम आहे.

एकी असावी तर अशी : ५० वर्षांपासून बाणगाव ग्रामपंचायत बिनविरोध

author img

By

Published : Dec 31, 2020, 12:22 PM IST

Updated : Dec 31, 2020, 12:38 PM IST

नांदगांव (नाशिक) - तालुक्यातील बाणगाव बुद्रुक व बाणगाव खुर्दचा गेल्या 50 वर्षांपासून बिनविरोध निवडणूकीचा इतिहास असून यंदाही निवडणूक बिनविरोध करून या गावाने एक आदर्श राज्यासमोर ठेवला आहे. सरकारने अशा विनास्वार्थ बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरव करण्याची इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

५० वर्षांपासून बाणगाव ग्रामपंचायत बिनविरोध

सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असून एकीकडे सरपंच व सदस्य निवडीसाठी लाखो नाहीतर कोट्यावधी रुपयांची बोली लावली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याऊलट मात्र नांदगांव तालुक्यातील बाणगाव बुद्रुकचा गेल्या 50 वर्षांपासून तर विभक्त झाल्यानंतर बाणगाव खुर्दचा 30 वर्षांपासून बिनविरोध निवडीचा इतिहास असून या दोन्ही गावांत कुठल्याही प्रकारची बोली न लावता जेवढ्या जागा तेवढेच सदस्य उभे करायचे आणि गावातील सर्वांना विश्वासात घेऊन निवडणूक बिनविरोध करायची परंपरा अविरत कायम आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे या निर्णयाच्या विरोधातही कोणी बोलत नाही. या परंपरेने सरकारचा खर्च तर वाचतोच मात्र उमेदवारांचाही अनावश्यक खर्च वाचतो. सध्या प्रत्येक ठिकाणी गावाच्या विकासाच्या नावाखाली बोली लाऊन सरपंच व सदस्यपद विकले जात आहेत. यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असून प्रत्येक ग्रामपंचायतीने या गावाचा आदर्श घ्यावा, असेही येथील ग्रामस्थांनी सांगितले.

लिलाव पद्धतीचा विरोध
आम्ही बाणगाव बुद्रुक व बाणगाव खुर्द ही दोन्हीही गाव गेल्या अनुक्रमे 50 व 30 वर्षांपासून बिनविरोध निवडणूक करतो. आम्ही आजपर्यंत कोणाला चहा देखील पाजला नाही तसेच यामुळे आमचा आणि सरकारचाही खर्च वाचतो. ज्या गावांत लिलाव पद्धत होते, तेथे विकास करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा लिलाव करणाऱ्यावर कारवाई करावी.

सर्वच समाजाचा सरपंच
बाणगाव बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावात आजपर्यंत सगळ्याच समाजातील एक जण का होईना सरपंच होऊन गेला आहे. सर्व जणांना सोबत घेऊन गावातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम येथील जेष्ठ नागरिक करतात.

हेही वाचा - कांदा निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

हेही वाचा - नाशिक शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री; मनुष्यांसह पक्षांनाही दुखापत

Last Updated : Dec 31, 2020, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.