ETV Bharat / state

दिंडोरी तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीतील मशागतीच्या कामांना वेग

यावर्षी ३ जून रोजी 'निसर्ग' चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि दिंडोरी, पेठ सुरगाणा तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला असल्याने बळीराजाने शेतीतील मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.

Pre monsoon farming activities started in dindori taluka nashik
दिंडोरी तालुक्यात मान्सुन पुर्व शेतीतील मशागतीच्या कामांना वेग
author img

By

Published : Jun 8, 2020, 4:05 PM IST

दिंडोरी (नाशिक) - दरवर्षी साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होत असते. त्या दृष्टीने शेतकरी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करतात. मात्र, यावर्षी ३ जून रोजी 'निसर्ग' चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि दिंडोरी, पेठ सुरगाणा तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला असल्याने बळीराजाने शेतीतील मशागतीच्या कामाला आता सुरवात केली आहे.

दिंडोरी तालुक्यात मान्सून पूर्व शेतीतील मशागतीच्या कामांना वेग...

हेही वाचा... देशातील महत्वाची मंदिरे दर्शनासाठी खुली.. शिर्डीला प्रतीक्षा राज्य सरकारच्या आदेशाची

दिंडोरी तालुक्यात निसर्ग चक्रीवादळानंतर दररोज सायंकाळी जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेती मशागत, मका, भुईमुग पिकांच्या पेरणीला सुरवात करण्यात आली आहे. मृग नक्षत्रात पेरणी केलेले कोणतेही पीक हे निरोगी असते. म्हणून मृग नक्षत्राच्या पावसाची शेतकरी वाट पाहत असतात. परंतु, यावर्षी एक जूनपासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.