नाशिक - येथील एका पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करण्यात आली आहे. शिवचरण पांढरे असे धक्काबुक्की करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सटाणा नगरपरिषदेचे भाजपा गटनेते महेश देवरे यांच्यासह 6 ते 7 ग्रामस्थांविरोधात जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नगरसेवक देवरे आणि अन्य ग्रामस्थ फरार झाले आहेत.
हेही वाचा - कोपर्डी अत्याचार प्रकरण :आरोपींना दिलेल्या शिक्षेची तत्काळ अंमलबजावणी करा; पीडितेच्या आईची मागणी
कोपर्डी अत्याचार प्रकरण :आरोपींना दिलेल्या शिक्षेची तत्काळ अंमलबजावणी करा; पीडितेच्या आईची मागणी
बागलाण तालुक्यातील पारनेर येथील ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे आणि जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यावेळी काही ग्रामस्थ मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत घोळक्याने उभे असल्याने पांढरे यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी भाजप गटनेते महेश देवरे आणि पांढरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आणि परस्परांना धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी देवरे आणि अन्य 6 ते 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.