ETV Bharat / state

पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवत भोंदूचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल - minor girl

एका मांत्रिकाने पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवत प्रसादातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ६ महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला.

भोंदूचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल
author img

By

Published : Jul 8, 2019, 11:45 AM IST

नाशिक - एका मांत्रिकाने पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवत प्रसादातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ६ महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस भोंदूबाबासह दोघा अज्ञात संशयितांचा शोध घेत आहेत.

भोंदूचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित भोंदूबाबा आणि त्याचे मांत्रिक मित्र यांनी 'तुमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी असते, यावर मांत्रिक उपचार आहेत. भोंदूबाबाने दैवीशक्तीच्या आधारे तुमच्या घरात पैशांचा पाऊस पाडू', असे सांगितले. यावर पीडितेच्या कुटुंबांने विश्वास ठेवला. त्यानंतर भोंदूबाबाने दर अमावस्या-पौर्णिमेला घरी येऊन पूजा करण्याचा बहाणा करत कुटुंबातील सर्वांना प्रसादातून गुंगीचे औषध दिले. गुंगीमुळे आई-वडील झोपेत असताना पीडित मुलीवर गुंगीतच भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ६ महिन्यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले असून त्यांनी याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस भोंदूबाबासह दोघा अज्ञात संशयितांचा शोध घेत आहेत.

Intro:"ती" अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने मांत्रिक बाबाचे बिंग फुटले....

Body:पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत प्रसादातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे,मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सहा महिन्यानंतर या प्रकरणी एका मांत्रिकासह दोघांवर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर येथील सातपूर परिसरात राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाला संशयित भोंदूबाबा आहेर त्याचा मांत्रिक मित्र यांनी,

तुमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी असते यावर मांत्रिक उपचार आहे करू तसेच बाबाकडे दैवीशक्ती असून तुमच्या
घरात पैशाचा पाऊस पडू असे सांगितले ह्यावर ह्या कुटुंबांनी विश्वास ठेवला,ह्या नंतर बाबांनी दर अमावस्या-पौर्णिमेला घरी येऊन पूजा करण्याचा बहाणा करत सर्व कुटुंबांना प्रसादातून गुंगीचे औषध दिले,गुंगीमुळे आई-वडील झोपेत असताना पीडित मुलीवर गुंगीतच लैंगिक अत्याचार केला ,सहा महिन्यांनी मुलगी जेव्हा गर्भवती राहिली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलं,ह्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले असुन,त्यांनी ह्या बाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस भोंदूबाबा सह दोघा अज्ञात संशयितांनचा शोध घेत आहे....

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.