ETV Bharat / state

Adhik Mass Bathing: अधिक मास स्नानासाठी गोदावरी तीरावर लेक-जावयांसह भाविकांची गर्दी

अधिक महिना संपायला आला असल्याने नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देशभरातून रोज हजारो भाविक रामकुंड तीर्थावर स्नान करण्यासाठी येत असल्याने या भागाला कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Adhik Mass Bathing
गोदावरी स्नान
author img

By

Published : Aug 10, 2023, 3:54 PM IST

त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी स्नानासाठी भाविकांची गर्दी

नाशिक : दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मास' या महिन्याला धार्मिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या महिन्यात गोदावरी नदीत स्नान केल्यास पुण्य मिळते अशी मान्यता आहे. त्यामुळे या अधिक महिन्यात मोठ्या संख्येने भाविक पुण्य प्राप्तीसाठी देशभरातून गोदावरी तीरावर पूजाविधी, स्नान करण्यासाठी गर्दी करत आहेत. अधिक मास, श्रावणामुळे एकीकडे धार्मिक पर्यटनाला चालना मिळते आहे. दुसरीकडे स्‍थानिक तसेच विविध ठिकाणावरुन येणाऱ्या भाविकांकडून पूजा विधी, जप-तपाला महत्त्व दिले जाते आहे.

श्रावण मासामुळे रामतीर्थावर गर्दी : रामतीर्थावर गोदावरी पूजन आणि दीपदान करण्यासाठी भाविक आवर्जून हजेरी लावत आहेत. तसेच व्रत, पूजनातून सध्या अधिक मासात भगवान विष्णूची आराधना केली जात आहे. यंदाच्‍या चतुर्मासातील श्रावण मासाला सुरुवात होणार असल्‍याने यानिमित्त भगवान शंकराची आराधना केली जाणार आहे. श्रावणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर, सोमेश्‍वर, कपालेश्‍वर प्रशासनाकडून आवश्‍यक ते नियोजन केले जात आहे.

पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आवश्यक : अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. पुरुषोत्तम हे भगवान विष्णूचे नाव आहे. या अधिक महिन्यामध्ये गोदावरी नदीचे स्नान करून पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करून भगवान विष्णूंची महापूजा केली जाते. यासोबतच जावयाला वाण दिले जाते. जावयाला विष्णू स्वरूप मानले जाते. अधिकमासामध्ये 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. या संख्येएवढे दान करावे तसेच विष्णूची कृपा व्हावी यासाठी गोदावरी तीरावर स्नान केल्यास त्याचे अधिक पुण्य मिळते, अशी धारणा आहे. सध्या स्नान करण्यासाठी भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत असून पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवला पाहिजे, अशी मागणी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केली आहे.

म्हणून विष्णू याग : अधिक महिन्यातील देवता ही विष्णू आहे. त्यामुळे विष्णूची आराधना केल्यास त्याचे पुण्य मिळते, असेही सांगितले जाते. विष्णूला तुळस प्रिय आहे; म्हणून रोज सकाळी विष्णूला तुळस अर्पण करावी. तसेच ठिकठिकाणी या महिन्यात विष्णू याग, भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. या महिन्यात दान, पुण्य, स्नान केल्यास त्याचा लाभ अधिक होत असल्याचे गुरूजी सतीश शुक्ल यांनी सांगितले आहे. सामाजिक मान्यता काय आहेत याची माहिती येथे दिली आहे. यामध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला महत्व देण्याचा ईटीव्ही भारतचा उद्देश नाही.

हेही वाचा:

  1. नाशिकमध्ये रामकुंडावर पंढरपुरासारखे भक्तीमय दृष्य; भाविकांनी गोदावरी नदीत केले स्नान
  2. Magh Purnima 2023 : माघ पौर्णिमेला कशी पूजा करावी, वाचा सविस्तर माहिती
  3. Magh Mass 2023 : माघ महिन्यात हे तीन स्नान करायला विसरू नका, दानाचे विशेष महत्त्व आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.