ETV Bharat / state

नाशिकमध्ये रामकुंडावर पंढरपुरासारखे भक्तीमय दृष्य; भाविकांनी गोदावरी नदीत केले स्नान - ramkund

विठुरायाचे दर्शन घेत अनेक भाविकांनी पंढरपूरातील पवित्र चंद्रभागेत स्नान करण्याचा योगायोग रामकुंडावरील गोदावरी नदीत स्नान करून अनुभवला.

गोदावरी नदीत स्नान करताना भाविक
author img

By

Published : Jul 12, 2019, 5:20 PM IST

Updated : Jul 12, 2019, 5:46 PM IST

नाशिक- आषाढी एकादशी निमित्ताने आज नाशिकमध्येसुद्धा पंढरपुरासारखे भक्तीमय दृष्य पाहावयास मिळाले. विठुरायाचे दर्शन घेत अनेक भाविकांनी पंढरपूरातील पवित्र चंद्रभागेत स्नान करण्याचा योगायोग रामकुंडावरील गोदावरी नदीत स्नान करून अनुभवला.

गोदावरी नदीत स्नान करताना भाविक

पंढरपूरला जाऊ न शकणार्‍या अनेक भाविकांनी आज पहाटेपासूनच रामकुंडावर स्नान करत दीप सोडुन संकल्पपूर्ती केली. हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी गंगाघाटावर जमली होती. या महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गोदावरी नदी खळखळून वाहत होती. भाविकांनी चातुर्मास आणि आषाढी एकादशीचा योग साधत या नदीतील रामकुंडावर स्नानाचा आनंद लुटला. रामकुंड परिसरात तसेच काळाराम मंदिराच्या दक्षिणेकडे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. गंगा घाटावर स्नान करून भाविकांनी या मंदीरात एकच गर्दी केली होती.

Intro:'सावळे रूप ते मनोहर' हि भावना ठेवून आषाढी एकादशी निमित्ताने आज नाशिकमध्ये अवघी दुमदुमली पढरीच दृश्य पहायला मिळाल पंढरपूरला जाऊन पवित्र चंद्रभागेत स्नान करण्याचा योगायोग आज अनेक भाविकांना नाशिक मध्ये रामकुंडावरील विठुरायाचे दर्शन घेत गोदावरीत स्नान करून अनुभवलाBody:पंढरपूरला जाऊ न शकणार्‍या अनेक भाविकांनी आज पहाटेपासूनच रामकुंडावर स्नान करत दीप सोडुन संकल्पपूर्ती केली हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी गंगाघाटावर जमली होती ह्या महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गोदावरी नदी खळखळून वाहत असुन रामकुंडावर भाविकांनी स्नानाचा आनंद लुटलाConclusion:रामकुंड परिसरात तसेच काळाराम मंदिराच्या दक्षिणे कडे विठ्ठल रुक्माई चे मंदिर आहे गंगा घाटावर स्नान करून भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली होती तसेच आज पासून चातुर्मासाला सुरुवात झाल्याने , चातुर्मास आणि आषाढी एकादशीचा योग साधत भाविकांनी गोदावरी रामकुंडावर स्नानाचा आनंद घेतला
Last Updated : Jul 12, 2019, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.