ETV Bharat / state

इगतपुरी तालुक्यातील नागरिकांकडून समीर भुजबळांना लोकनिधी, तालुका समस्यामुक्त करण्याचे भुजबळांचे आश्वासन - loksabha

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव आणि मोडाळे या गावातील नागरिकांनी भुजबळांचे उत्स्फुर्त स्वागत केले. निवडणूक खर्चासाठी येथील तरुणांनी भुजबळांना ४२ हजारांची रोख रक्कम दिली. यावेळी महिलावर्गात विशेष उत्साह दिसून आला. समीर भुजबळ यांनी गावातील सर्व स्तरातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.

इगतपुरीतील नागरिक समीर भुजबळांना निधी देताना
author img

By

Published : Apr 1, 2019, 11:06 AM IST

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक मतदारसंघाचे उमेदवार समीर भुजबळ यांनी इगतपुरी तालुक्यातील लोकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, त्यांना ४२ हजारांची रक्कम निवडणूक निधी म्हणून दिला. निवडून आलो तर इगतपुरी समस्यामुक्त करू, असे आश्वासन यावेळी समीर भुजबळांनी दिले.

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव आणि मोडाळे या गावातील नागरिकांनी भुजबळांचे उत्स्फुर्त स्वागत केले. निवडणूक खर्चासाठी येथील तरुणांनी भुजबळांना ४२ हजारांची रोख रक्कम दिली. यावेळी महिलावर्गात विशेष उत्साह दिसून आला. समीर भुजबळ यांनी गावातील सर्व स्तरातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.

समीर भुजबळांनी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाटे, कुशेगाव, सांजेगाव, आहुर्ली, शेवगेडांग, म्हसुर्ली, ओंडली, नागोसली, धारगाव, वैतरणा, आवळी दुमला, कऱ्हाळे, रायंबे, कावनई या गावांचा दौरा केला. यावेळी ग्रामस्थांनी अनेक समस्यांचा पाढा वाचला. भुजबळ यांनी सगळ्याचे मत जाणून घेत उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.

भुजबळ म्हणाले, की विद्यमान खासदाराने तालुक्यात कोणतीही ठोस योजना आणली नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील त्यांना सोडविण्यात आला नाही. सरकारच्या शेतीविषयक धोरणांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. तरुण बेरोजगार आहेत. मी निवडून आलो तर संपूर्ण इगतपुरी तालुका समस्यामुक्त करू, असे भुजबळ म्हणाले.

यावेळी भुजबळांसोबत निर्मला बोंबले, अनिल गोरे, संदिप बोंबले, विकास शेंडगे, हरीभाऊ गोरे, संतोष बोडके, कल्पना बोंबले, राहुल बोंबले, नामदेव आहेर, भिका मेदडे, गजराम शिंदे, सुरेश कालेकर, कचरू मेदडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव व मोडाळेतून समीर भुजबळांना ४२ हजारांची लोकवर्गनी

समीर भुजबळ यांनी इगतपुरी तालुक्यातील गावांचा दौरा करत असतांना गावागावात समीर भुजबळ यांचे नागरिकांनी स्वागत केले जात आहे,यावेळी समीर भुजबळ यांनी पारावर, ओट्यावर बसलेल्या ज्येष्ठ महिला,पुरुष, तरुण, तरुणी त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला. दौऱ्यादरम्यान इगतपुरी तालुक्यातील सांजेगांव आणि मोडाळे या गावातील काही तरुणांन प्रेम आणि निष्ठेच्याप्रती आपल्या पॉकेटमनीतून लोकवर्गणी काढून दोन्ही गावांमधून प्रत्येकी २१ हजार असे एकूण ४२००० हजार रुपयांचा निधी समीर भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी तरुणांचा विषेशतः महिलावर्गाचा प्रंचड उत्साह दिसुन आला.याप्रसंगी गावागावात  नागरीकांनी एकत्र येत त्यांच्याच गावातील ग्रामदैवतेला साक्षी  ठेवत समीर भुजबळ यांना निवडुन आणण्याचा संकल्प केला. 

समीर भुजबळ हे गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी दौऱ्यावर असून त्यांनी आज  इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाटे, कुशेगांव,सांजेगांव,आहुर्ली, शेवगेडांग, म्हसुर्ली,ओंडली, नागोसली, धारगांव, वैतरणा, आवळी दुमला, कऱ्हाळे, रायंबे, कावनई आदी गावांचा दौरा करून येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी सद्याचे खासदार निवडणूक आल्यानंतर कधीच फिरकले नसल्याचे सांगून अक्षरशः समस्यांचा पाढाच समीर भुजबळ यांच्यापुढे वाचला.

यावेळी समीर भुजबळ म्हणाले की, गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत निवडणूक आलेल्या सेनेच्या खासदाराने तालुक्यात कोणतीही ठोस योजना आणली नाही. साधा गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील त्यांना सोडविता आला नसून अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहे. सरकारचे शेती विषयक स्थिर धोरण न राहिल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळत नसल्याने बेरोजगारांचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा अनेक समस्या इगतपुरी तालुक्यातील जनतेच्या पाचवीला पुजल्या गेल्या आहे. त्यामुळे संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील समस्यांची सोडवणूक करून सर्व इगतपुरी तालुका समस्यामुक्त करण्यासाठी वचनबद्ध राहू असे अभिवचन समीर भुजबळ यांनी तालुक्यातील नागरिकांना दिले. 

 निर्मला बोंबले, उपसरपंच अनिल गोरे,  संदीप बोंबले, विकास शेंडगे, हरीभाऊ गोरे, संतोष बोडके, कल्पना बोंबले, राहुल बोंबले, नामदेव आहेर, भिका मेदडे, गजराम शिंदे, सुरेश कालेकर, कचरु मेदडे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टीप सोबत फोटो जोडले आहेत..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.