नाशिक: मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी समाधान झनकरचे 19 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याच्याकडून तरुणीकडे लग्नासाठी वारंवार तगादा लावला जात होता. त्यातच रविवारी दुपारी एकच्या सुमारास संबंधित तरुणी आई-वडिलांसोबत दुचाकीवरुन प्रवास करत होती. दरम्यान चारचाकीतून आलेल्या समाधान झनकरने आपल्या साथीदारांसह घोटी-पांढुर्ली महामार्गावरून तरुणीचे अपहरण केले. तसेच तिच्या आई-वडिलांना धक्काबुक्कीही केली.
तणावातून आत्महत्या: मुलीचे अपहरण आणि तरुणाचा लग्नासाठी तगादा यामुळे मुलीचे पालक तणावाखाली आले होते. यानंतर वडील निवृत्ती किसन खातळे (४९ वर्षे) आणि आई मंजुळा निवृत्ती खातळे (४० वर्षे) यांनी देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. नाशिक रोड रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले.
पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार: पोलिसांनी ग्रामस्थ आणि नातेवाईकांना वारंवार विनंती करूनही आक्रमक ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांच्या उपस्थितीतच संशयित मुलाच्या घरासमोर दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल: याप्रकरणी मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार सिन्नर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला गेला. यात आरोपी समाधान झनकर या तरुणासह त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला गेला. पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप भालेराव आणि शैलेश पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुण्यात तरुणीचे अपहरण: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रेम प्रकरणे तसेच हत्या या गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. पुण्यातील स्वारगेट येथील जेधे चौकातून प्रेम प्रकरणातून दोघांनी एका तरुणीचे चारचाकी गाडीतून अपहरण केले. 20 फेब्रुवारी, 2023 रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर लग्न नाही केले तर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे ठार करण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली.
काय होते प्रकरण? याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सोमनाथ सुनिल सुळ (वय 25 वर्षे), गणेश बापुराव महानवर (वय 30 वर्षे, दोघे रा. केसनंद फाटा वाघोली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी व आरोपी सोमनाथ हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहे आणि एकाच गावातील आहेत. पूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबध होते. मात्र, सोमनाथ याच्या स्वभावावरून दोघांमध्ये सतत भांडण होत होते. त्यांच्यात सतत वाद होत असल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते. ही घटना 18 ते 19 फेब्रुवारी रोजी घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग, अपहरण, जीवे ठार मारण्याची धमकी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: