ETV Bharat / state

नवाब मलिक यांचे फडणवीसांवरील आरोप हास्यास्पद - पंकजा मुंडे - देवेंद्र फडणवीस

गेली काही दिवस राज्यात ड्रग्ज प्रकरणांवरून राजकारण सुरू आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील ड्रग्ज माफिया हे देवेंद्र फडणविसांच्या इशाऱ्यावर चालतात, असा गंभीर आरोप केला. त्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे
author img

By

Published : Nov 1, 2021, 4:41 PM IST

नाशिक - अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंडरवर्ल्ड ड्रग्ज माफियांशी संबधांचा आरोप केला होता. या प्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडेंना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरे बापरे! ते असे बोलले मला माहित नाही. हे तर हस्यास्पद आहे, असे सांगत फडणवीसांवर असललेले आरोप चुकीचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि उद्घाटन झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की जे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री होते त्यांच्याबाबत असे आरोप करणे हास्यास्पद आहे. फडणवीस यांनी राज्यात मोठे काम उभे केले.

हेही वाचा-नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या - प्रवीण दरेकर

संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही...

भाजप नेते प्रमोद महाजन आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर राहिल्याने आणि त्यांचे संस्कार मिळाल्याने मी 35 ते 40 मिनिटे भाषण करू शकते. परंतु आता काही जणांना या विषयी वाईट वाटते. मी आणि मंत्री छगन भुजबळ अशा वर्गातून येतो की त्या वर्गात संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे आम्ही संघर्ष करतो. आम्हाला आमच्या समाजातील वर्गासाठी जे येईल ते खेचून आणतो, असे मुंडे यानी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा-...नाहीतर जनता तुम्हाला "चिरुटे" सारखी चिरडेल - आशिष शेलार

नवाब मलिक यांनी हा केला आहे आरोप

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील ड्रग्ज माफिया हे देवेंद्र फडणविसांच्या इशाऱ्यावर चालतात, असा गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी आज (सोमवार) अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट करत 'या' ड्रग्स पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय? असा सवाल केला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मलिक यांनी अमृता यांच्यासोबतची फोटोमधील व्यक्ती ही जयदीप राणा असल्याचे सांगतीले. तसेच जयदीप राणा हा ड्रग्ज ट्राफिकिंगमध्ये सध्या तुरुंगात आहे. या ड्रग्ज माफियासोबत फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. फडणवीस यांच्याच काळात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाल्याचेही मलिक म्हणाले. मुंबईत ड्रग्जचा गोरख धंदा वाढवण्यासाठीच वानखेडे यांना एनसीबीमध्ये आणले गेले का? असाही प्रश्न उपस्थि होत असल्याचे मलिक म्हणाले आहेत.

हेही वाचा-नवाब मलिकांचे आरोप बेछूट, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील - भाजप नेते चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.