नाशिक - जिल्ह्यात झपाट्याने कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. कोविड रुग्णालयात बेडसाठी रुग्ण प्रतिक्षेवर असतांना दुसरीकडे ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. सद्य स्थितीत नाशिक जिल्ह्यात 80 हजार मेट्रिक टनची गरज असून आता केवळ 13 हजार मेट्रिक टन ऑक्सीजन शिल्लक असल्याचे चित्र आहे.
नाशिक जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाने रुद्र रूप धारण केले आहे. दररोज 4 हजार नवीन रुग्ण आढळून येत असून सद्यस्थितीत 35 हजार हुन अधिक रुग्ण उपचार घेत आहे. वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेडची कमतरता जाणवत असून नातेवाईक रुग्णांना घेऊन हॉस्पिटलच्या पायऱ्या झिझवत आहे. एकीकडे बेड मिळत नाही तर दुसरीकडे ऑक्सीजनचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात रोज 70 ते 80 हजार मेट्रिक टन ऑक्सीजनची गरज असून केवळ 35 हजार मेट्रिक टन ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. आता तर केवळ 13 हजार मेट्रिक टन ऑक्सीजन शिल्लक असून रूग्णांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहे.
कोरोना हॉस्पिटल वाढलेनाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने हॉस्पिटलची संख्या वाढली आहे. त्यामुळे ऑक्सीजनचीही गरज वाढली आहे. काल (बुधवार) 70 हजार मेट्रिक टन ऑक्सीजनचा पुरवठा झाला त्यातील 22 हजार मेट्रिक टन ऑक्सीजन शिल्लक होता. त्यातील काही ऑक्सीजचा पुरवठा झाला असून आता केवळ 13 हजार मेट्रिक टन ऑक्सीजन शिल्लक असल्याची माहिती आहे. नाशिकला ऑक्सीजन उपलब्ध होईल, ऑक्सीजनच्या मागणीसाठी आम्ही हेल्पलाईन नंबर दिले आहे. असं मत अन्न व औषध विभागाच्या उपआयुक्त माधुरी पवार यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन विरोधात मुंबईतील झवेरी बाजारातील व्यापाऱ्यांनी केले आंदोलन