नाशिक- वाढत्या कांद्याच्या भावावर नियंत्रण राहावे, कांदा निर्यात कमी व्हावी आणि देशातील कांदा देशातच राहावा या हेतूने, कांदा निर्यातीवर 850 प्रति डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्याचे नोटिफिकेशन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत डिजीएफटीकडून जारी करण्यात आले. मात्र, तरी देखील उत्पादन आणि पुरवठा यात घट झाल्यामुळे कांद्याच्या किमती कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा- नाशिकमध्ये गणेश विसर्जनादरम्यान दोन गणेशभक्त बुडाले
कांद्याचे निर्यातमूल्य वाढवून निर्यात कमी होईल आणि वाढलेले कांद्याचे दर कमी होत होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे दर कमी होणार नसून शेतकऱ्यांनी घाईगडबडीत कांदा विक्री करू नये, असे सांगण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये होलसेल भावात 2700 ते 2900 रुपये हजार प्रति क्विंटल भावाने कांद्याची विक्री होत आहे.
हेही वाचा- विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा ढोल फुटणार- गिरीश महाजन
देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा असल्याने निर्यात थांबवणे सरकारसाठी क्रमप्राप्त आहे. विरोधी पक्षाला उत्तर देण्यासाठी डॅमेज कंट्रोल म्हणून असे उपाय सरकारला करावे लागत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, शेतकऱ्यांनी एकदम कांद्याची विक्री केली तरी पुन्हा टॉकीजच्या हातात कांदा जाऊन सरकारच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयमी विक्री केल्यास ग्राहकाला देखील त्याचा फायदा होऊ शकतो.