ETV Bharat / state

Criminal Massacre : नाशिकमध्ये थरार.. सराईत गुन्हेगाराच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार करून हत्या.. - Criminal Massacre

नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणामध्ये (Quarrel and murder over petty cause) एका सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने वार (weapon attack on Goons Nashik) करून त्याचा खून केल्याची (notorious criminal murder) घटना घडली आहे. (two arrested in Murder Case) (Nashik Crime), (criminal massacre Nashik)

Criminal Massacre
सराईत गुन्हेगाराच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार करून हत्या..
author img

By

Published : Oct 29, 2022, 10:29 PM IST

नाशिक : नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणामध्ये (Quarrel and murder over petty cause) एका सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने वार (weapon attack on Goons Nashik) करून त्याचा खून केल्याची (notorious criminal murder) घटना घडली आहे. तसेच खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 2 संशयितांना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत अटक (two arrested in Murder Case) केली. (Nashik Crime), (criminal massacre Nashik)

कोयत्याने डोक्यावर वार - याबाबत सविस्तर माहिती अशी की 28 ऑक्टोंबर ला रात्रीच्या सुमारास तन्मय मनोज गोसावी व आकाश अनिल साळुंखे हे दोघे महालक्ष्मी नगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर बसलेले असताना अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला. यावेळी त्यांच्यात वाद झाले. संशयित तन्मय गोसावी याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षय जाधव यांच्या डोक्यात वार केला. त्याचवेळी या ठिकाणाहून अक्षय समोर असलेल्या घराच्या एका बाल्कनीत पळाला. तर गोसावी व साळुंखे हे त्याच्या मागे पळाले व पुन्हा एकदा अक्षयच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड मारला तसेच या ठिकाणी असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने अक्षयला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित हे त्याला मारतील या भीतीने तो पळून गेला. त्यानंतर त्याने अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली असता अंबड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले व जखमी अक्षय जाधव यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पोलीस गाडीत बसवून जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान अक्षयचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.

अक्षय जाधव सराईत गुन्हेगार - अक्षय सराईत गुन्हेगार असून अंबड पोलीस ठाण्यामध्ये याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. अक्षय जाधव हा वीस दिवसांपूर्वीच नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून जमिनावर बाहेर आला होता. गेल्या वर्षी त्यास शहर जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आलेले होते. खून, प्राणघातक हल्ले, घरफोड्या, हाणामाऱ्या, लुटमार यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.