येवला (नाशिक) - रासायनिक खतांकरता लागणारे गॅस व इतर साहित्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे रासायनिक खतांच्या किंमतींमध्येही भरमसाठ वाढ (Massive Increase In The Price Of Chemical Fertilizers) झाली आहे. त्याचा फटका नक्कीच आता शेतकऱ्यांना बसत आहे. रासायनिक खतांकरिता लागणारा गॅस कोरोना महामारीमुळे कंपनीकडे उपलब्ध होत नसल्याने रासायनिक खतांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत 300 रुपयांनी वाढ झाली आहे. कधी अवकाळी पाऊस तर, कधी ढगाळ वातावराणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असतांना रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.
Chemical Fertilizers Price Increased : रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ, शेतकऱ्यांना फटका
रासायनिक खतांच्या किमतीत तीनशे रुपये वाढ झाली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ (Massive Increase In The Price Of Chemical Fertilizers) झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. खतांची ही भाववाढ कमी करण्याची मागणी (Demand for reduction of fertilizer prices) शेतकऱ्यांकडून होत आहे.