ETV Bharat / state

नाशिक : येवल्यात शिक्षिकेसह मुलीवर शेजाऱ्यांकडून प्राणघातक हल्ला - येवला मारहाण बातमी

घर परिसरातील जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केल्याचा राग मनात धरून ही मारहाण झाली आहे. मारहाणीत सुनिता यांच्या हाताला 19 टक्के पडले असून डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्रियांकाच्या हाताला, पोटाला आणि पायाला जबर मार लागला आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Sep 18, 2020, 1:25 AM IST

येवला (नाशिक) - शिक्षिका आणि तिच्या मुलीवर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या कुटुंबाकडून या दोघींना बेदम मारहाण करण्यात आली असून याबाबत येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षिका सुनिता पाटील आणि त्यांची मुलगी प्रियांका निकम ह्या हुडको कॉलनी परिसरात राहतात. त्यांच्या घराला लागून पोळ कुटुंब राहते. पोळ यांनी घराच्या बाजूला अतिक्रमण करून येण्या-जाण्याचा रस्ता बंद केल्याची तक्रार सुनिता यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली होती. ह्याचा राग मनात धरून 12 सप्टेंबरला सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान पोळ कुटुंबातील सदस्यांनी सुनिता पाटील आणि त्यांची मुलगी प्रियांका यांच्यावर लाठ्या-काठ्या, कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला.

हेही वाचा - ऑनलाइन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी मोबाईल टॉवर जोडणीला प्राधान्य द्या - पालकमंत्री छगन भुजबळ

मारहाणीत सुनिता यांच्या हाताला 19 टक्के पडले असून डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्रियांकाच्या हाताला, पोटाला आणि पायाला जबर मार लागला आहे. या घटनेनंतर सुनिता यांनी येवला पोलीस ठाण्यात पोळ कुटुंबातील सचिन पोळ, वैशाली पोळ, ऋतिक पोळ, योगेश पोळ, प्रतिभा पोळ, प्रतिभा भालेराव, सुभाष बोरसे, अशोक खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी सुनिता पाटील आणि प्रियांका यांना उपचारसाठी येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित आरोपींपैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य काही संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - जिल्ह्यात व्हेंटिलेटर खाटांची संख्या वाढणार; ऑक्सिजनची समस्या मार्गी लावणार - पालकमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.