नाशिक - एकीकडे गॅसची दरवाढ आणि दुसरीकडे उज्ज्वला योजनेमध्ये १ कोटी गॅस जोडणी करण्याचा निर्णय सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री महिला असतानादेखील या अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणताही चांगला निर्णय घेतला गेला नाही, तसेच देशात महागाई वाढत आहे ह्याचा निषेध म्हणून मंगळवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक..! - नाशिक राष्ट्रवादी महिला काँग्रेस आंदोलन
महागाई विरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. रस्त्यावर स्वयंपाक करत वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या घरगुती गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
नाशिक
नाशिक - एकीकडे गॅसची दरवाढ आणि दुसरीकडे उज्ज्वला योजनेमध्ये १ कोटी गॅस जोडणी करण्याचा निर्णय सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री महिला असतानादेखील या अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणताही चांगला निर्णय घेतला गेला नाही, तसेच देशात महागाई वाढत आहे ह्याचा निषेध म्हणून मंगळवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
महागाई विरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. रस्त्यावर स्वयंपाक करत वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या घरगुती गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. उज्ज्वला गॅस योजनेचा फक्त दिखावाच करण्यात आला आहे, यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. महागाई कमी करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
अर्थसंकल्पातून कसलीही भरीव तरतूद नाही..
देशात मागील ७ वर्षांपासून मोदी सरकार सत्तेत असताना सर्वसामान्य लोकांसाठी कुठलाही योग्य निर्णय झाला नाही. त्यातच २०२० चे पूर्ण वर्ष कोरोनासारख्या भयंकर आजारात गेले, ज्यात मध्यमवर्गीय व सर्वसामान्य लोकांना अत्यंत कठीण परिस्थितीत आपले जीवन जगावे लागले, कष्टकरी व कामगार वर्ग ह्यांना असेल त्या पद्धतीने आपल्या गावाकडचा मार्ग स्वीकारावा लागला व हातात काहीही काम नसताना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागला.
त्यातच सोमवारी देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जो २०२१ साठी डिजिटल अर्थसंकल्प सादर केला, त्यात मात्र त्याच डिजिटलमधून ह्या देशातील कष्टकरी, कामगार वर्ग व सर्वसामान्य महिलांसाठी मात्र कसलीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. अर्थसंकल्पात धनदांडग्यांच्या हिशोबाने होणारे निर्णय आणि त्यातून सर्व सामान्य माणसांच्या मात्र काहीच हातात पडत नाही, हे मात्र मोदी सरकार नेहमीच दाखवत आले आहेत. झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशात उज्ज्वला गॅसच्या जोडणीची मर्यादा १ कोटी इतक्या संख्येइतकी वाढविण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा प्रत्यक्षात किती उतरतेही पण शक्यताच असणार आहे. मात्र, त्यापूर्वीच त्याच अर्थसंकल्पात इंधन दरावर अधिभार लावण्याची घोषणा करून सर्वसामान्य जनतेवरच भार टाकला, अशी टीका यावेळी बलकवडे ह्यांनी केली आहे.