ETV Bharat / state

कोरोनाचे संकट फूल उत्पादकांच्या मुळावर.. मागणी नसल्याने शेतकऱ्याने फुलशेती केली जमीनदोस्त - लॉकडाऊनमुळे फूलशेती संकटात

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून, यामुळे फूल शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. लग्न समारंभ, मंदिरे,धार्मिक विधी तसेच इतर एकत्रित येत साजरे होणारे सोहळे बंद असून यामुळे फुलांची मागणी घटली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने पॉलीहाऊस मधील 30 गुंठे फूलशेती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

nasik Flower growers farmers in crisis
शेतकऱ्याने फुलशेती केली जमीनदोस्त
author img

By

Published : May 23, 2020, 1:22 PM IST

Updated : May 23, 2020, 2:53 PM IST

नाशिक -कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फूलशेती करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने फुलांना मागणी नाही. यामुळे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कांचन गाव येथील प्रगतशील शेतकरी जनार्दन गव्हाणे यांनी पॉलीहाऊस मधील 30 गुंठे फुलशेती जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाचे संकट फूल उत्पादकांच्या मुळावर
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून,यामुळे फुल शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. लग्न समारंभ, मंदिरे,धार्मिक विधी तसेच इतर एकत्रित येत साजरे होणारे सोहळे बंद असून यामुळे फुलांची मागणी घटली आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कांचन गाव येथील प्रगतशील शेतकरी जनार्दन गव्हाणे यांच्या बाबतीत ही असंच घडलं आहे. मागील वर्षी 10 गुंठे मध्ये लावलेल्या फुल शेतीत चांगले उत्पादन मिळाले म्हणून त्यांनी या वर्षी बँकेचे कर्ज काढून पॉलीहाऊस मध्ये 30 गुंठे मध्ये शेवंती ह्या फुलांची लागवड केली..मात्र पुढील 2 महिने कोरोनामुळे परिस्थिती सुधारणार नाही म्हणून हाता तोंडाशी आलेली फुलशेती जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता त्यांनी बँकेतून घेतलेले 4 लाखाचे कर्ज कसे फेडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत बँक कर्जामध्ये सवलत द्या, असं म्हटलं आहे.फुलशेती उत्पादक जनार्दन गव्हाणे म्हणतात, की मागील वर्षी फुलशेतीमधून चांगले उत्पादन आले म्हणून हिंमत करून बँकेतून 4 लाखाचे कर्ज काढून पॉलीहाऊसमध्ये मोठ्या प्रमाणत शेवंती फुलांची लागवड केली. आता काही दिवसातच त्याचे उत्पादन देखील येणार आहे. मात्र मुंबई, पुणे, दिल्ली येथील व्यापाऱ्यांशी बोललो ते म्हणाले, पुढील काही दिवस मंदिरे, लग्न, धार्मिक विधी होणार नसून फुलाला मागणी नसणार आहे. त्यामुळे मी फूल शेती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे माझे 6 ते 7 लाखांचे नुकसान होणार आहे. सरकारने फ़ुलशेती शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही गव्हाणे यांनी केली आहे.

Last Updated : May 23, 2020, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.