नाशिक - हैदराबाद प्रकरणातील चार संशयीत आरोपींचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यु झाला. या घटनेबाबत सर्वच स्तरातून भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान, शहरातील विद्यार्थीनींनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या एन्काऊंटरवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा - हैदराबाद एन्काऊंटर : शाळकरी मुलींचा जल्लोष, तर देशातून आल्या 'या' प्रतिक्रिया
आरोपींना न्यायालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर शिक्षा झाली असती तर खऱ्या अर्थाने पीडितेला न्याय मिळाला असता, अशा प्रतिक्रिया काही विद्यार्थीनींनी दिल्या आहेत. तर, काही विद्यार्थ्यांनीनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे कौतुक केले आहे.