नाशिक Godavari water level Rises : नाशिकमध्ये जोरदार पाऊस झालाय. 91 टक्के भरलेल्या गंगापूर धरणातून सकाळी एक वाजेपासून टप्प्याटप्प्याने शेकडो क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. परिणामी दुपारी 1 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 10 हजार क्यूसेक पाणी गंगापूर धरणातून सोडण्यात आलंय. (Godavari water level Rises)
जनजीवन विस्कळीत : गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराची ओळख असलेल्या दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागले आहे. रामसेतू पूलही अर्धा पाण्याखाली गेलाय. तसेच गोदावरी नदीकाठी असलेले छोटे छोटे मंदिर पुराच्या पाण्याखाली गेले आहे. जिल्हा प्रशासन गोदाकाच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पावसाचा जोर कायम राहिल्यास गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय. जोरदार पावसामुळे शहरातील मुंबई नाका, द्वारका, नाशिकरोड, गंगापूर रोड भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच शहरातील सकल भागात पाणी साचल्याने नागरिकांना मार्ग काढतांना मोठी कसरत करावी लागत आहे. (Godavari water level Rises)
15 सप्टेंबर पर्यंत पाऊस : राज्यात पावसाला अनुकूल वातावरण झाले आहे. आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज असून दोन दिवस शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गुरुवारी पहाटेपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्यात नाशिक शहरातील पावसाची 10 मिलिमीटर नोंद करण्यात आलीय. रात्री आठ वाजल्यापासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने सध्या गंगापूर धरण समूहात 90 टक्के पाणीसाठा आहे. आजच्या दिवशी गेल्या वर्षी तो 97 टक्के होता. अजूनही 7 टक्के तूट भरून निघण्याची प्रतीक्षा आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाला अनुकूल वातावरण असून 15 सप्टेंबर पर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. त्यानंतर पुन्हा 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज असल्याच हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
हेही वाचा :