नाशिक - मागील वर्षी नाशिक महापालिकेचा स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या यादीत 67 वा क्रमांक आला होता. मात्र, यंदा टॉप टेनमध्ये येण्यासाठी नाशिक महापालिकेने कंबर कसली आहे. शहरात सुटीच्या दिवशीही अधिकारी व कर्मचारी स्वच्छतेचे काम करत आहेत.
नाशिकचे नाव स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत पहिल्या दहांमध्ये यावे यासाठी, नाशिक पालिकेचे कर्मचारी व अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शहरातील रस्ते, उद्याने, सार्वजनिक स्थळ स्वच्छ करण्यासाठी सुटीच्या दिवशीही काम करत आहेत. त्याचबरोबर सतत प्रबोधन करूनही अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आजपर्यंत 600 पेक्षा अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'लोकसभेतील पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळत आहेत'
शहरातील सार्वजनिक स्थळांबरोबर रस्ते, दुभाजक, वाहतुक बेटे, मंदिरे आदींची सफाई केली जात आहे. ठिकठिकाणी भिंती रंगवल्या जात आहे. विभागीय स्तरावर लक्ष्य देऊन जनजागृतीसह अधिकारी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत आहेत. पहिल्या तिमाहीच्या दोन चाचणीत देशात चौथ्या आणि सातव्या क्रमांकवर नाशिक आहे. त्यामुळे पहिल्या दहामध्ये येण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
हेही वाचा - संतापजनक...अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार