नाशिक - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यर्त्यांनी या वेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, पोलीस भरती रद्द करण्याची आग्रही मागणी केली.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. नाशिकमध्ये जिल्ह्यातील मराठा समाजाने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. आरक्षणाला मिळालेली स्थगिती निघण्यासाठी सरकारने लवकरात लवकर प्रयत्न करावेत आणि पोलीस भरती रद्द करावी, अशा मागण्या मराठा आंदोलनकांनी केल्या आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज आंदोलन होणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने भुजबळ यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.