ETV Bharat / state

नाशिकच्या कोरोना नियंत्रणासाठी 40 लाख लसी द्या; जिल्हाधिकाऱ्यांची केंद्राकडे मागणी

जिल्ह्यात गरजेच्या तुलनेत उपलब्ध लसींची संख्या अत्यल्प आहे. लसींच्या मागणी आणि पुरवठ्यातील ही तफावत दूर करण्यासाठी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केंद्राच्या आरोग्य सेवा संचालकांना पत्र लिहून लसींबाबतची मागणी कळविली आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Apr 1, 2021, 7:04 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून रुग्णवाढीच्या संख्येत देशातील पहिल्या दहा शहरात नाशिकचा समावेश आहे. ही वाढ कमी करायची असेल तर लसीकरण वाढवणे हा एकमेव उपाय आहे. पहिला व दुसरा टप्पा मिळून ४० लाख लसींचा पुरवठा करावा, या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केंद्राच्या आरोग्य सेवा संचालकांना पाठविले आहे.

जिल्ह्यात गरजेच्या तुलनेत उपलब्ध लसींची संख्या अत्यल्प आहे. लसींच्या मागणी आणि पुरवठ्यातील ही तफावत दूर करण्यासाठी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केंद्राच्या आरोग्य सेवा संचालकांना पत्र लिहून लसींबाबतची मागणी कळविली आहे. शिल्लक लसींच्या संख्येनुसार जिल्ह्यात सध्या केवळ ९ लाख ८२० लसी उपलब्ध आहेत. या जोरावर केवळ काही दिवसाचे लसीकरण पार पाडले जाऊ शकते.

२ लाख ७३ हजार १०६ लस देण्यात आल्या

सद्यस्थितीत वेगाने फैलावणारा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी टाळेबंदी करावी की नाही, अशा द्विधा मनस्थितीत सरकार आणि प्रशासन आहे. या स्थितीत
कोरोनामुळे विशेषत: कोमॉर्बिड रुग्णांची होणारी गंभीर स्थिती आणि वाढणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय प्रशासनाला वाटत आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत ३ लाख १२ हजार ८० लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी २ लाख ७३ हजार १०६ लस देण्यात आल्या आहेत. यातील ११ हजार ६४४ लस मात्रा वाया गेल्या. हे प्रमाण ३ टक्के आहे. सद्यस्थितीत आरोग्य विभागाकडे ९ लाख ८२० लसींची उपलब्धता आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.