ETV Bharat / state

कोरोना बाधित क्षेत्र वा व्यक्तींशी संबंध आलेल्या नागरिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क करावा -जिल्हाधिकारी सूरज मांढरे - नाशिक जिल्हाधिकारी

कोरोना बाधित क्षेत्र व व्यक्तींशी कशाही प्रकारे संपर्क आलेल्या नागरिकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे
जिल्हाधिकारी सूरज मांढरे
author img

By

Published : Apr 7, 2020, 8:40 AM IST

नाशिक - जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असताना आपण आपल्या जिल्ह्यात सुरुवातीपासूनच काही उपाययोजना करुन बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. परंतु, बाहेरून काही लोक विविध कारणांनी जिल्ह्यात शिरकाव करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणावर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना बाधित क्षेत्र व व्यक्तींशी कशाही प्रकारे संपर्क आलेल्या नागरिकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे

आज प्रशासनाकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून याद्या येत आहेत. जे लोक इतर जिल्ह्यातून आले असतील किंवा काही ठिकाणी त्यांनी धार्मिक संस्थानमध्ये जावून आले असतील अशा लोकांनी कोरोनाविषयी कुठलेही गैरसमज न बाळगता स्वत:हून समोर येवून प्रशासकीय यंत्रणेचा वेळ व क्षमता वाचवावी अशी सूचना मांढरे यांनी केली आहे. बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांना कोरोनाविषयीचे काही लक्षणे दिसत असतील, त्यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क करुन उपचार घ्यावे. जे नागरिक जाणिवपूर्वक संपर्क करण्याचे टाळतील व कोणत्या संसंर्गाला कारणीभूत ठरतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.