ETV Bharat / state

Nashik anti corruption : नाशिक अंँटीकरप्शनची मोठी कारवाई, अहमदनगरच्या दोन अभियंत्याना तब्बल १ कोटीची लाच घेताना अटक - नाशिक अंँटीकरप्शनची मोठी कारवाई

Nashik anti corruption : नाशिक अंँटीकरप्शन ब्युरोनं मोठी कारवाई केली आहे. अहमदनगरच्या दोन अभियंत्याना तब्बल १ कोटीची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर एमआयडीसीचे सहाय्यक उपअभियंता अमित गायकवाड आणि तत्कालीन उप अभियंता गणेश वाघ यांच्यावर ही कारवाई केली आहे.

Nashik anti corruption
Nashik anti corruption
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 8:54 AM IST

Updated : Nov 4, 2023, 2:04 PM IST

नाशिक अंँटीकरप्शनची मोठी कारवाई

नाशिक/अहमदनगर Nashik anti corruption : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधीक्षकपदी शर्मिष्ठा वालावलकर आल्यानंतर सगळ्याच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यांची धडक कारवाई करण्याची पद्धत तसंच कुणाचीही तमा न बाळगता कर्तव्यात कसून न करण्याचा बाणा असल्यानं त्यांचा दरारा पूर्वीपासून आहे. आता त्यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. राज्याच्या अँटी करप्शन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकानं अहमदनगर एमआयडीसीचे उपअभियंता अमित गायकवाड आणि तत्कालीन विभागीय अभियंता गणेश वाघ यांना तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.

शर्मिष्ठा वालावलकर यांची धडाकेबाज कारवाई - अहमदनगर मध्ये शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकानं तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. या संदर्भात रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांच्यासह तत्कालीन सहाय्यक उपअभियंता गणेश वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री उशिरा लाच घेताना अटक - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 1000 mm व्यासाचे पाईप टाकण्याचं काम केलं होतं. या कामाचं तब्बल 2 कोटी रुपये बिल झालं होतं. दरम्यान या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचं बिल आउटवर्डवर घेऊन तत्कालीन अभियंताची स्वाक्षरी घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान नाशिक प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकानं शुक्रवारी रात्री नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. या प्रकरणामध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50% वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड यांनी दिली आहे.

अडीच कोटींच्या बिलासाठी 1 कोटीची लाच - छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 100 एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचं काम केलं होतं. या कामाचे 2 कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे म्हणून सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचं आउटवर्ड करुन त्याच्या सह्या घेतल्या. देयकं पाठवण्याच्या मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसंच वाघ यांच्याकरता या बिलाच्या कामाचं व यापूर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची लाच म्हणून एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती, तशी तक्रार शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली.

अशी केली कारवाई - नाशिक लाच लुचपत पथकाने शुक्रवारी सायंकाळी संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात सापळा लावला. त्यावेळी मागणी केलेली लाचेची एक कोटी रुपयांची रक्कम गायकवाड याने स्वतःसाठी तसंच वाघ याच्याकरता तक्रारदार ठेकेदाराकडून एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्वीकारली. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेच्या रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हि श्श्याचे 50 टक्के कोठे पोहचवावे याबाबत विचारलं असता वाघ याने सांगितलं की, 'राहु दे तुझ्याकडे तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी, सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवून दे', असं म्हणून वाघ याने गायकवाड याला फोनवरून सांगत लाच मागणीस व स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा

Nashik Bribe : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कारकून लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Last Updated : Nov 4, 2023, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.