ETV Bharat / state

Narahari Jirwal : नरहरी झिरवाळ नॉट रीचेबल; दिंडोरी तालुक्यात लागले दादांचे शुभेच्छा फलक.. - आमदार नरहरी झिरवाळ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडत असल्याचे चित्र असताना, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आमदार नरहरी झिरवाळ काल पासून नॉट रिचेबल आहे.

Narahari Jirwal
नरहरी झिरवाळ
author img

By

Published : Jul 4, 2023, 4:20 PM IST

नाशिक : दिंडोरी नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे गटनेते अविनाश पवार यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देत तालुक्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे फोटो बॅनर वर टाकले आहेत,अशात झिरवाळ यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.

आमदार नरहरी झिरवाळ भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह : आमदार नरहरी झिरवाळ हे आपल्या साध्या व्यक्तीमत्वामुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे, शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात, मात्र दुसरीकडे सन 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीला नरहरी झिरवाळ हे उपस्थित राहिल्याने ते चर्चेत आले होते, नंतर त्यांनी आपले अपहरण झाल्याचे सांगत आपली छाती फोडली तरी त्यात शरद पवार साहेबच दिसतील असे विधान आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले होते,मात्र आता पुन्हा दुपारच्या शपथविधी दरम्यान झिरवाळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दिसून आले,मात्र या शपथविधीनंतर त्यांचा फोन हा नॉट रीचेबल असल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय : दिंडोरीचे आमदार झिरवाळ हे गेल्या काही वर्षापासून सातत्याने प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत, त्यांनी विधानसभेत केलेले भाषण असो किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नात पत्नीला खांद्यावर केलेले नृत्य अशा एक ना अनेक कारणाने ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत,नेहमीच माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यात ते पटाईत आहेत.झिरवाळ यांनी पुन्हा एकदा शपथविधीला लावलेल्या उपस्थितीमुळे ते चर्चेत आहे,मात्र यानंतर ते नॉट रीचेबल असल्याने मतदारसंघात त्यांच्या बाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे,झिरवाळ यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने ते पुढे ही प्रसिद्धीच्या झोतात राहील..

भाजपाची पंचायत : या साऱ्या घटना घडामोडीत खरी पंचायत झाली ती भाजपाच्या कार्यकर्त्यांची, कालपर्यंत राष्ट्रवादीला ट्रोल करणाऱ्यांना आता हात आखडता घ्यावा लागला असून समर्थनाचे संदेश पाठवावे लागले आहे, असे असले तरी ५ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे,शिवसेनेचे उद्धव ठाकरे व महाराष्ट्र निर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी फक्त शिवसेना या नावाखाली एकत्र निवडणूक लढवल्यास पुढील काळात सत्ता हस्तगत करू शकतात असा मतप्रवाह समोर येतोय..

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाने बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक, ठाकरे पवारांची साथ देणार का?
  2. Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक सुरू; कट्टर विरोधक बसले शेजारी, खातेवाटपाबाबत चर्चा
  3. Maharashtra Political Crisis: भाजप म्हणजे राजकारणातील 'सिरीयल किलर आणि बलात्कारी'- संजय राऊत यांची गंभीर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.