ETV Bharat / state

नाशिक येथील मुथ्थुट दरोडा प्रकरणी आरोपींवर मोक्काची कारवाई

१४ जून रोजी नाशिक येथील उंटवाडी रोडवरील मुथ्थुटच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात कर्मचारी साजू सॅम्युअल याच्यावर गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली व आरोपींचा शोध घेण्यासाठी बारा पथके परराज्यात पाठविली होती. ह्या पथकांकडून संशयितांचा शोध घेत असतांना विजय बहादूर सिंह राजपूत, परमेन्द्र सिंग, आकाश सिंग विजय बहादुर सिंह राजपूत या तिघांना उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार सुबोध सिंह आणि त्याच्या टोळीतील ८ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक येथील मुथुट दरोडा प्रकरणी आरोपींवर मोक्काची कारवाई
author img

By

Published : Aug 26, 2019, 4:36 PM IST

नाशिक- शहरातील उंटवाडी रोडवरील मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा झाला होता. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार सुबोध सिंह आणि त्याच्या टोळीतील ८ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परराज्यातील गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सांगितले.

मुथुट दरोडा प्रकरणी आरोपींवर मोक्काची कारवाई

१४ जून रोजी नाशिक येथील उंटवाडी रोडवरील मुथ्थुटच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात कर्मचारी साजू सॅम्युअल याच्यावर गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली व आरोपींचा शोध घेण्यासाठी बारा पथके परराज्यात पाठविली होती. या पथकांकडून संशयितांचा शोध घेत असतांना विजय बहादूर सिंह राजपूत, परमेन्द्र सिंग, आकाश सिंग विजय बहादूर सिंह राजपूत या तिघांना उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली.

चौकशी दरम्यान टोळीमागे बिहारमधील मोठे अंडरवर्ल्ड कंपनी असल्याचे समोर आले. तपासात सुबोध सिंह हा दरोड्यातील मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले. सुबोधनेच दरोड्याचा कट रचल्याचे समजले. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ३ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र मुख्य सूत्रधार सुबोध सिंह यासह ५ जणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

कुख्यात गुन्हेगार सुबोध सिंह सध्या बिहारमधील बेऊर मध्यवर्ती कारागृहात मुक्कामी आहे. त्याच्या हस्तांतरासाठी बिहार पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आले आहे. लवकरच त्याला बिहारमधून ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच त्याच्या चौकशीत इतर आरोपी सदस्य देखील निष्पन्न होतील असा पोलिसांना विश्वास आहे.

Intro:मुथुट दरोड्यातील नऊ आरोपीनंवर मोक्काची कारवाई.परराज्यातील आरोपींन वर कारवाईची पहिलीच घटना...

Body:नाशिक येथील मुथूट फायनान्स दरोड्यातील मुख्य सूत्रधार सुबोध सिंह आणि त्याच्या गॅंगच्या आठ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ,परराज्यातील गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं ही पहिलीच घटना असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सांगितले
14 जून रोजी नाशिक येथील उंटवाडी रोडवरील मुथूटच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता,या दरोड्यात कर्मचारी साजु सॅम्युअल याच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती,पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेत
आरोपींच्या मार्गावर बारा पथके पाठविण्यात परराज्यात पाठवण्यात आली होती,ह्या पथकाकडून संशयितांचा शोध घेत असतांना विजय बहादुर सिंह राजपूत,परमेन्द्र सिंग,आकाश सिंग विजय बहादुर सिंह राजपूत या तिघांना उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली, चौकशीमध्ये टोळी मागे बिहारमधील मोठं अंडरवर्ल्ड कंपनी असल्याचं समोर आलंय, या दरोड्याचा मुख्य सूत्रधार सुबोध सिंह याचं नाव समोर आलय,ह्याने दरोड्याचा कट रचला होता,आतापर्यंत तीन संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले असून,मुख्य सूत्रधार सुबध सिंह यासह पाच जणांच्या पोलीस मागावर आहे...

कंपनीचा कुख्यात गुन्हेगार सुबोध सिंह सध्या बिहारमधील बेऊर मध्यवर्ती कारागृहात आहे, त्याच्या हस्तांतरासाठी बिहार पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आले असून लवकरच त्याला बिहारमधून ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सांगितले, तसेच त्याच्या चौकशीत इतर आरोपी सदस्य देखील निष्पन्न होतील असा पोलिसांना विश्वास आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.