नाशिक: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज ठाकरे यांना (Gurudakshina on stamp paper) शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून त्यांचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी पोहचले होते. यात नाशिकमधील देखील शेकडो कार्यकर्त्यांनी राज यांचे निवासस्थान शिवतीर्थ याठिकाणी जाऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यातच नाशिकमधील नेहमी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे चर्चेत असलेला विद्यार्थी आघाडीचा माजी पदाधिकारी शाम गोहाड याने चक्क 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर राज ठाकरे यांना कायम आपल्या सोबत निष्ठावंत राहील, (Gurudakshina To Raj Thackeray) असे शपथपत्र गुरूपौर्णिमेची भेट म्हणून दिले आहे. राज ठाकरे यांनी देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी आनंदाने या शपथपत्राचा स्वीकार करत शाम याचे कौतुक केले.
काय आहे पत्रात?
प्रति,
मा. श्री. राजसाहेब ठाकरे
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मी शाम प्रकाश गोहाड पक्षाच्या स्थापनेपासून आपल्या ध्येय धोरण विचारांशी जोडला गेलेलो आहे. आपल्या
मार्गदर्शनाखाली नाशिक येथे पक्षकार्यात होईल. ते मनापासून योगदान देण्याचा आजपर्यंत पूर्णत: प्रयत्न करत आलो आहे. आणि यापुढेही करत राहाणार. आज गुरूपोर्णिमे निमित्त 'गुरूदक्षिणा' म्हणून मी आपणांस हे शपथपत्र लिहून देतो की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या विचारांशी व नेतृत्वाशी बांधील राहील. मी पक्षकार्यात स्वत:ला तन-मन-धनाने वाहून घेतलेलेच आहे. परंतु, कितीही कठीण परिस्थितीती उद्भवली, तरी आपली साथ सोडणार नाही. मी आपल्याशी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी प्रामाणिक राहून एक सक्रिय, निष्ठावान म्हणून मी स्वत:ला आपणांस अर्पण करीत आहेत.
राज ठाकरे यांचे भाषण व्हायरल: राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चोथा करून ठेवलाय या लोकांनी, विचका करून टाकला, वाट लावून टाकली, निवडणुकांच्या तोंडावर युत्या आणि आघाड्या तोडताय, आप-आपल्या मस्तीत आहेत सगळे जण. तुमचा कोणी नाही विचार करणार, नीतिमत्ता नावाची काही गोष्टच शिल्लक राहिली नाही. कोण या पक्षातून त्या पक्षात, असे वक्तव्य करणारा राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ आहे.
हेही वाचा:
- Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक संपली; कट्टर विरोधक बसले शेजारी, खातेवाटपाबाबत चर्चा
- Maharashtra Political Crisis Update : अजित पवारांनी सर्व खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची 5 जुलैला बोलावली बैठक
- Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाने बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक, ठाकरे पवारांची साथ देणार का?