नाशिक- शिवसेना आमदार अनिल कदम आणि पोलीस यांच्यात रिक्षा चालकांवर होणाऱ्या कारवाईवरून जोरदार बाचाबाची झाली. पोलीस रिक्षावर कारवाई करताना रिक्षा जवळ असलेले काही कार्यकर्ते हे मोबाईलवर व्हिडिओ काढत असताना पोलिसांनी त्यांना हटकल्याचा कारणावरून हा वाद झाला.
काल रात्रीच्या सुमारास नाशिक मधील मालेगाव स्थानकाजवळ रिक्षाचालकांवर कारवाई चालू होती. यावेळी अनिल कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये रिक्षा कारवाईचे व्हिडिओ शूटिंग केले. पोलिसांनी व्हिडिओ शूटिंग करत असतानाच कार्यकर्त्यांना हटकले. यावरून हा वाद झाला.
अनिल कदम यांच्या कार्यकर्ते पोलीस रिक्षाचालकाकडून पाचशे रुपये घेत असताना व्हिडिओ शूटिंग करत होते. यावेळी पोलिसांनी एका कार्यकर्त्याची कॉलर पकडली व व्हिडिओ करू नका असे सांगितले. या कारणावरून अनिल कदम व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात वाद झाला.