नाशिक - कारमधून तस्करी केला जाणारा लाखो रुपयांचा गुटखा नाशिक पोलिसांच्या वाहतूक शाखेने जप्त केला आहे. पंचवटी मधील बळी मंदिर परिसरात एक संशयास्पद वाहन पोलिसांना आढळून आल्यानंतर चालकासह वाहन ताब्यात घेण्यात आले.
मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर चौफुलीवर नाकाबंदी सुरू असताना पांढऱ्या रंगाची कार (एम एच 39 जे 3743) आली. पोलिसांना चकवा देत ती कार राससबिहारी रस्त्याने जाऊ लागल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे संबंधित कारचालकाला थांबवून पोलिसांनी कारची तपासणी केली. तपासणीत कारमध्ये गुटख्याच्या 62 गोण्या आढळून आल्या. तसेच साधारणपणे सात लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.
शहरात पेट्रोलिंग करत असताना शहर वाहतूक शाखेच्या युनिट 1 ने केलेल्या कारवाईत पोलिसांनी येथील जैद शेख (पाथर्डी फाटा) व फैयाज शेख (भद्रकाली) या दोघांना ताब्यात घेतले आहे.