नाशिक - जिल्ह्यातील वणी भागातील ननाशी परिसरात 25 मे रोजी दुपारी चारच्या सुमारास पुन्हा भूकंपाचा 2.4 रेकटर स्केलचा सौम्य धक्का बसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. 14 मे रोजी या परिसरात असेच धक्के जाणवले होते.
नागरिकांनी काढला घराबाहेर पळ
नाशिकच्या मेरी संस्थेत सदर भूकंपाची नोंद झाली असून नाशिकपासून 40 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असून दुपारी 4:12 मिनिटांनी 2.4 रिकटर स्केलचा धक्का बसल्याची माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली आहे. पेठ - दिंडोरी - सुरगाणा- कळवण तालुक्याचे सीमावर्ती भागातील घाटमाथा परिसरात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धक्का जाणवताच नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. परिसरात एकमेकांना फोन करत माहिती घेतली, मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये…
नाशिक पासून 40 किलोमीटर अंतररावर हा भूकंपाचे धक्के बसले असून केवळ 2.4 रेकटर स्केलचा सौम्य धक्का आहे. मात्र पेठ, सुरगाणा, दिंडोरी या भागातील डोंगराळ भागात भूगर्भात होत असलेल्या हालचालीमुळे अशा प्रकारचे धक्के बसत असल्याचा अंदाज आहे हे धक्के धक्के अतिशय सौम्य असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.