नाशिक - नांदगावमधील मतिमंद निवासी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिवजयंतीचा उत्साह पाहून अनेकांना गहिवरून आले. या निवासी शाळेतील मुलांनी आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.
संपूर्ण उच्चार नीट करता येत नसतानाही 'छत्रपती शिवाजी महाराज की.. म्हणताच ..'जय' म्हणण्याची या विद्यार्थ्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती. शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करताना थरथरणारे हात उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच शिवाजी महाराजांविषयीचा आदरभाव, तळमळ व आत्मीयता विद्यार्थ्यांमध्ये दिसत होती.