नाशिक - महाराष्ट्राकडूनफे 23 वर्षाखालील महिला क्रिकेट संघात खेळणाऱ्या नाशिकच्या फिरकीपटू माया सोनवणे यांच्या भेदक फिरकीच्या जोरावर महाराष्ट्राने तामिळनाडूवर 71 धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित पुडुचेरी येथे महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू असा टी-२० सामना झाला.
हेही वाचा - आला रे !..मुंबई इंडियन्समध्ये 'जबरा' खेळाडू दाखल, आता इतर संघांना बसणार 'शॉक'
तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 119 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात नाशिकच्या सलामीवीर साक्षी कानडी यांनी 31 व प्रियंका घोडके यांनी 14 धावांनी मजल मारली. त्यांनी 5.2 षटकात 38 धावांची दमदार सलामीची भागीदारी केली.
मात्र, तामिळनाडूचा संघ गोलंदाज माया सोनवणे यांच्या भेदक फिरकीचा सामना करू शकला नाही, व 16.5 षटकात सर्वबाद 48 धावाच त्यांना करता आल्या. मायाने 3.5 षटकात 15 धावा देऊन चार गडी बाद केले व तामिळनाडूला 48 धावात गुंडाळले. प्रियंकानेही गोलंदाजीत एक गडी बाद करून तिला सुरेख साथ दिली.
हेही वाचा - चेंडूशी छेडछाड; मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या 'या' खेळाडूवर आयसीसीची बंदी
महाराष्ट्राचा पुढील सामना हैदराबाद विरुद्ध 15 नोव्हेंबर रोजी होणार असून, या सामन्यात देखील या त्रिकुटाकडून नाशिककरांना मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.