नाशिक - कोरोनामुळे संचारबंदी लागू असतानाही, काही तरुण विनाकारण रस्त्यावर दुचाकीवरून फिरत होते. तेव्हा पोलिसांनी या तरुणांना चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी त्या तरुणांना उठाबश्या काढायला लावले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे संपूर्ण देश २१ दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तर राज्यात कलम १४४ लागू आहे. यामुळे नगरपालिका प्रशासन व पोलिसांकडून घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. पण वारंवार सांगून देखील नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहे.
शनिवारी मनमाड शहर पोलिसांना विनाकारण रस्त्यावर फिरताना काही तरुण आढळले. तेव्हा पोलिसांनी त्यांना उठाबश्या काढण्याच्या शिक्षा दिली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या या शिक्षेने तरूणांमध्ये काही प्रमाणात का होईना, धास्ती निर्माण झाली आहे.
हेही वाचा - मालवाहतुकीच्या वाहनांमध्ये प्रवासी आढळल्यास कारवाई, पोलिसांचा इशारा
हेही वाचा - भाजपाच्या तिन्ही आमदारांचा 50 लाखांचा निधी भाजीविक्रेत्यांसाठी; मास्क, सॅनिटायजरसाठी करणार खर्च