मनमाड (नाशिक) Malegaon Bomb Blast : आयबी व दहशतवादी पथकानं २००६ सालच्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील एका आरोपीला मंगळवारी रात्री नाशिकच्या नगरसोल येथून अटक केली. पोलिसांनी त्याची मनमाडमध्ये तब्बल ७ तास चौकशी केली. मात्र हाती काहीही न लागल्यानं त्याला आता सोडून देण्यात आलं आहे.
नगरसोल रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतलं : २००६ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या एका व्यक्तीवर इन्टेलिजन्स ब्युरो व दहशतवादविरोधी पथकाची करडी नजर होती. तो मनमाड येथून रात्री रेल्वेनं औरंगाबादकडे जाणार असल्याची माहिती मनमाड पोलिसांना मिळाली होती. मात्र तो तिथे मनमाड पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यानंतर तत्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्याला येवला तालुक्यातील नगरसोल रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं. तिथे मनमाड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
गणेश मंडळाच्या देखाव्याचं चित्रीकरण करत होता : पोलिसांनी रात्री या व्यक्तीला मनमाडमध्ये आणलं. तिथे इन्टेलिजन्स ब्युरो आणि दहशतवादविरोधी पथकानं त्याची सुमारे ७ तास चौकशी केली. ही व्यक्ती मनमाड आणि मालेगाव येथे काही गणेश मंडळाच्या देखाव्याचं चित्रीकरण करण्यास आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र चौकशीत काहीच न सापडल्यानं त्याला सोडून देण्यात आलं.
आरोपींची २५ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयात हजेरी : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयानं १५ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व आरोपींना नोटीस बजावली होती. या खटल्याच्या संदर्भात साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली आहे. या खटल्यात एकूण ३१३ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. आता या आरोपींना २५ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयात हजर राहाणं सक्तीचं आहे. भाजपाच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर या प्रकरणातील एक आरोपी आहेत. या सर्व आरोपींना फौजदारी संहिता प्रक्रिया ३१३ नुसार हजेरी लावावी लागणार आहे.
हेही वाचा :
- Malegaon bomb blast Case : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात हजर राहा... न्यायालयाचे साध्वी प्रज्ञासिंहसह आरोपींना आदेश
- Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर पाकिस्तानी आयएसआय बनवतेय वेब सिरीज; प्रसाद पुरोहित यांचा कोर्टात धक्कादायक दावा
- Ram Kadam On Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी संघाला बदनाम करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा कट