नाशिक - दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २१ डिसेंबरला किसान सभेच्या नेतृत्वात नाशिकहून शेतकरी दिल्लीला कूच करणार असून त्यास महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
किसान सभेच्या मोर्चाला राज्यात कोणतीही अडचण येणार नाही
एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांनी आंदोलनाबाबत विचारले असता त्यांनी वरील भूमिका मांडली. किसान सभेच्या मोर्चाला राज्यात कोणतीही अडचण येणार नाही. शेतकरी आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याचे भुजबळ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, हा एकमेव हेतू असून कुणालाही आंदोलनापासून अडविण्याचा कुठलाही हेतू नाही. शेतकरी आंदोलनासाठी शासनाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.