ETV Bharat / state

Mahashivratri 2023 : फुलांनी, रंगीत रोषणाईने त्र्यंबकेश्वर मंदिराची सजावट, पर्वस्नान बघण्यासाठी भाविकांची गर्दी

author img

By

Published : Feb 18, 2023, 1:05 PM IST

Updated : Feb 18, 2023, 1:55 PM IST

बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक विधी होत आहेत. भगवान भोले नाथांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक त्रंबकेश्वर नगरीत दाखल झालेत. भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाने शनिवारी पहाटे 4 वाजेपासून रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे.

Mahashivratri 2023
फुलांनी, रंगीत रोषणाईने त्र्यंबकेश्वर मंदिराची सजावट

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. निर्बंध शिथिल झाल्यापासून भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला आहे. दोन वर्षांपासून बंद असलेले शिव मंदिर यावर्षी भाविकांच्या अलोट गर्दीने गजबजलेले आहे. आज शनिवार रोजी महाशिवरात्र पर्वकाळ सुरू झाला असून यानिमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर शनिवारी पहाटे 4 वाजेपासून रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे.

भविकांसाठी सुविधा : त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईकरुन सजवण्यात आले आहे. तसेच मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार, येथे फुलांची सजावट करण्यात आली आहे. नुकत्याच बांधण्यात आलेल्या भव्य दर्शन मंडपातून व त्याच्या दोन्ही विंगमधून येणाऱ्या भाविकांची सोय ही करण्यात आली आहे. दर्शनार्थ येणाऱ्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. तातडीने दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी देणगी दर्शन दिवसभर सुरु राहणार आहे.

तीन दिवस कार्यक्रमाची रेलचेल : शनिवार दुपारी दोन वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्र्यंबकेश्वर यांच्यावतीने घोषवादन तसेच सायंकाळी 5.30 वाजता समूह बासरीवादन, सायंकाळी 7.30 वाजता कीर्तनकार चंद्रशेखर शुक्ल यांचा शिवस्तुती हा कार्यक्रम होणार आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजता,पटशिष्य पंडित प्रसाद दुसाने यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली.

भव्य पालखी सोहळा : महाशिवरात्र पर्वकाळानिमित्त स्थानिक दहा आखाडे,आश्रम व मठातील साधुसंतांनी आज कुशावर्तामध्ये पर्वस्नान केले. कुंभमेळा स्नानाची आठवण यावी,असा हा सोहळा होता. रात्री दोन वाजेपासून श्रीपंचायती निरंजनी आखाड्यामध्ये साधुसंत जमण्यास सुरुवात झाली. बॅण्ड पथक, दोन ढोलपथक, पेशवाई थाटाच्या लाईटच्या छत्र्या असा सर्व लवाजमा मिरवणुकीने निघाला. डाॅ. आंबेडकर चौक, नगर पालीका कार्यालय, रिंग रोड, तेली गल्ली मार्गे मिरवणूक कुशावर्तावर आली. मिरवणूकीत ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पर्वस्नान बघण्यासाठी मोठी गर्दी : मिरवणुकीत महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा, महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती (निरंजनी आखाडा), १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज (जुना आखाडा), ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज (जुना आखाडा), ठाणापती महंत धनंजयगिरीजी (निरंजनी आखाडा), पिर गणेशनाथजी महाराज ( गोरक्षनाथ मठ ) आदींसह विविध आखाड्यांचे ठाणापती, पदाधिकारी, साधुमहंत,भक्त परिवार सामील झाले होते. कुशावर्त तिर्थावर गंगापुजन करुन सर्वांनी पर्वस्नान केले. यानंतर ठिक चार वाजता सर्व साधुसंतांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात जाऊन पूजा केली. मंदिराच्या सभामंडपात आरती केली. पुजेचे पौरोहित्य जुना आखाड्याचे तिर्थपुरोहित वेदमुर्ती त्रिविक्रम जोशी, निरंजनी आखाड्याचे तिर्थपुरोहित वेदमुर्ती प्रमोद जोशी, रतिश जोशी, प्रविण देशमुख यांनी केले. देवस्थान ट्रस्टच्यावतीने विश्वस्त भुषण अडसरे यांनी सर्व साधुसंतांचे स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक शामराव गंगापुत्र उपस्थित होते. यानंतर गोरक्षनाथ मठामध्ये सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. तेथून सर्व साधुसंत निरंजनी आखाड्यात आले व नंतर आपापल्या स्थानावर निघून गेले. पर्वस्नान बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सिटीलिंकच्या जादा बसेस : सद्यस्थितीत सिटीलिंकच्यावतीने तपोवन आगरातून 15 बसेसच्या माध्यमातून 106 बस फेर्‍या त्र्यंबकेश्वरसाठी दिल्या जातात. बसफेर्‍यांव्यतिरिक्त महाशिवरात्रीनिमित्त तपोवन आगारातून 6 बसेसच्या माध्यमातून 48 तर नाशिकरोड आगारातून 4 बसेसच्या माध्यमातून 32 अश्या एकूण 10 ज्यादा बसेसच्या माध्यमातून 80 ज्यादा बसफेर्‍यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. ज्यादा 80 बसफेर्‍या व नियमित 166 बसफेर्‍या अशा एकूण 246 बसेस धावणार आहेत. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : Mahashivratri 2023 : हरहर महादेव...महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी

Last Updated : Feb 18, 2023, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.