ETV Bharat / state

NCP Political Crisis : जे झाले, ते घरातूनच झाले; भविष्यात तेलगीप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणार, छगन भुजबळांचा शरद पवारांना इशारा - छगन भुजबळ शरद पवार टीका

राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील शरद पवारांच्या सभेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी अजित पवारांच्या बंडखोरीवरून शरद पवारांवर टीका केली आहे.

NCP Political Crisis
छगन भुजबळ पत्रकार परिषद
author img

By

Published : Jul 9, 2023, 12:17 PM IST

Updated : Jul 9, 2023, 7:32 PM IST

छगन भुजबळ

नाशिक : राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणारे आज पवारांसोबत आहेत. नाशिकची जनता माझ्याबरोबर आहे. शिस्तभंग झालेल्या नेत्यांनी काल राष्ट्रवादीच्या सभेची तयारी केली. २००३ मध्ये तेलगी प्रकरणात मला लक्ष्य केले. तेव्हा सीबीआयच्या आरोपपत्रात नाव नव्हते, असे म्हणत भविष्यात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत आहेत.

'जे झाले, ते घरातूनच झाले' : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, मला शरद पवारांनी येवल्यात पाठविले नाही. मी येवल्याची निवड केली. मी ओबीसीचा नेता असल्याने शरद पवार येथे आले आहेत. तुम्ही किती ठिकाणी माफी मागणार? राज्यभरात माफी मागणार का? असा खोचक सवाल भुजबळ यांनी केला आहे. येवल्याचा 20 वर्षे विकास केला आहे. बारामतीनंतर येवल्याचाच विकास झाल्याचे पवार यांनी म्हटले होते. जे झाले, ते घरातूनच झाले. निकटवर्तीय का सोडून गेले, याचा विचार पवारांनी करावा, असा टोलाही भुजबळांनी लगावला.

'राजीनामा देणार हे माहित होते' : मोदी व शाह यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांना पाठवायचे. ते सुद्धा गेले आहेत. छगन भुजबळ यांनी हे सर्व घडवून आणले, हा पवार साहेबांचा चुकीचा समज आहे. 2014 व 2017 मध्ये सेनेला भाजपपासून दूर करण्याचे शरद पवारांचे प्रयत्न होते. शरद पवार यांनी पुस्तक समारंभात राजीनामा देण्याचे पंधरा दिवसापूर्वी ठरले होते. हे मला माहित होते. त्यावेळी मी घरातील वाद दूर करण्यास सांगितले होते, असेही भुजबळ यांनी सांगितले.

'मी कुठल्याच चर्चेत नव्हतो' : छगन भुजबळ पुढे म्हणाले की, शरद पवारांनी २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा दिला होता. तसेच त्यांनी २०१४ आणि नंतर २०१७ मध्ये शिवसेनेला सरकारमधून बाहेर काढण्याचे सांगितले होते. भुजबळ म्हणाले की, त्यावेळेला मी जेलमध्ये होतो. २०१९ मध्ये परत भाजपने शिवसेनेला सोडावे असे पवारांनी सांगितले. शिंदे गटाच्या बंडाच्या वेळी समर्थन देण्याच्या चर्चेत जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल होते. या प्रक्रियेत मी कोठेही नव्हतो, असेही ते म्हणाले.

उमेदवार देताना चूक झाली - शरद पवार : अजित पवारांनी 9 आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभर दौरे करण्यास सुरुवात केली आहे. पवार यांनी प्रथम छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात शनिवारी सभा घेतली. या सभेत त्यांनी त्यांच्या वयावरून वक्तव्य करणाऱ्यांना इशारा दिला. उमेदवार देताना आपली चूक झाल्याचे सांगत त्यांनी येवल्यातील जनेतची माफी मागितली. मात्र, पुन्हा अशी चूक होणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar in Yeoala - वयाची भाषा कराल तर महागात पडेल, शरद पवारांचा इशारा
  2. Maharashtra Political Crisis : दौऱ्याची सुरुवात करण्यास नाशिकच का निवडले, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा

Last Updated : Jul 9, 2023, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.