Live Update
5.30- 19 फेऱ्या पुर्ण. 1 लाख 63 हजार 250 मतांनी भारती पवार आघाडीवर. 6 फेऱ्या बाकी.
4.30- पंधराव्या फेरीनंतर भारती पवार 1 लाख 35 हजार 738 मतांनी आघाडीवर
4.00- भारती पवार 1 लाख 20 हजार 765 मतांनी आघाडीवर
3.25- भारती पवार 1 लाख ८ हजार 600 मतांनी आघाडीवर
2.37- नवव्या फेरीच्या अखेरीस डॉ. भारती पवार 104,247 मतांनी आघाडीवर
1.51- सातव्या फेरीच्या अखेरीस भारती पवार 71 हजारांनी आघाडीवर
1.38- सहाव्या फेरी अखेरीस भारती पवार 60342 मतांनी आघाडीवर
12.44pm- पाचव्या फेरी अखेर भारती पवार 48926 मतांनी आघाडीवर. भारती पवार यांना 129941 मते तर धनराज महाले यांना 81015 मते
12.12pm- चौथ्या फेरी अखेर भारती पवार यांना 30630 तर धनराज महाले यांना 18 हजार 151 मते मिळाली. भारती पवार यांनी 12479 मतांची आघाडी घेतली, असून चौथ्या फेरी अखेर भारती पवार यांनी 42044 मतांनी आघाडी घेतली आहे.
12.06- भारती पवार 23812 मतांनी आघाडीवर. भारती पवार यांना 24783 मते तर धनराज महाले यांना 15619 मते.
11.41am- तिसऱ्या फेरी अखेर भारती पवार 23812 मतांनी आघाडीवर
10.41am- दुसऱ्या फेरीत भारती पवार 14648 मतांनी आघडीवर
10.30am- भारती पवार आघाडीवर १७ हजार मतांनी आघाडीवर
8.00 am- प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात
नाशिक -दिंडोरी मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी बाजी मारत दिल्ली गाठली आहे. या मतदारसंघात भाजपकडून डॉ. भारती पवार, राष्ट्रवादीकडून धनराज महाले तर माकपचे आमदार जीवा पांडू गावित यांच्यात तिंरगी लढत पाहायला मिळाली होती. भारती पवार यांनी सुरुवातीपीसूनच आघाडी घेतली होती.
दिंडोरी मतदारसंघात आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात असून हा मतदारसंघ पूर्वी मालेगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघात पूर्वी काँग्रेस आणि जनता दलाचा बोलबाला राहिला आहे. परंतु, गेल्या ३ निवडणुकांपासून हा मतदारसंघ भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ताब्यात राहिला आहे. २००४ मध्ये या मतदारसंघातून मालेगावला वगळण्यात येऊन तो दिंडोरी मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला.
लोकसभा २०१४ निकाल
हरिश्चंद्र चव्हाण (भाजप ) ५ लाख ४२ हजार ७८४
डॉ.भारती पवार (राष्ट्रवादी ) २ लाख ९५ हजार १६५
हेमंत वाकचौरे (माकप) ७२ हजार ५९९