ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : बिल्डिंग मटेरियल सप्लायर्ससमोर अनेक अडचणी

author img

By

Published : May 19, 2020, 6:07 PM IST

मुंबई, पुणे नंतर नाशिक हे झपाट्याने वाढणारे शहर म्हणून आपली ओळख करू पाहत आहे. नाशिकला असलेले चांगले वातावरण, सुख सोयी ह्यामुळे पुणे-मुंबईचे नागरिक 'सेकंड होम' म्हणून नाशिकला पसंती देतात. त्यामुळे नाशिक मध्ये गेल्या दहा वर्षांपासून बांधकाम व्यावसायिकांनी हजारो सदनिका उभ्या केल्या आहेत. मात्र, लॉकडाऊन मुळे गेल्या दोन महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिकांबरोबरच बिल्डिंग मटेरियल सप्लायरांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे..

lockdown-is-affecting-building-material-suppliers-business-in-nashik
कोरोना इफेक्ट : बिल्डिंग मटेरियल सप्लायर समोर अनेक अडचणी..

नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातील बिल्डिंग मटेरियल सप्लायरांन समोर अनेक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.. गेल्या दोन महिन्यापासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातील बिल्डिंग मटेरियल सप्लायरांच्या माध्यमातून होणारी करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून हया व्यवसायावर अवलंबून असलेले ट्रक मालक, चालक, मजूर ह्याचा अडचणी वाढत आहे.

कोरोना इफेक्ट : बिल्डिंग मटेरियल सप्लायर्ससमोर अनेक अडचणी..

मुंबई, पुणे नंतर नाशिक हे झपाट्याने वाढणारे शहर म्हणून आपली ओळख करू पाहत आहे. नाशिकला असलेले चांगले वातावरण, सुख सोयी ह्यामुळे पुणे-मुंबईचे नागरिक 'सेकंड होम' म्हणून नाशिकला पसंती देतात. त्यामुळे नाशिक मध्ये गेल्या दहा वर्षांपासून बांधकाम व्यावसायिकांनी हजारो सदनिका उभ्या केल्या आहेत.

मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिकांबरोबरच बिल्डिंग मटेरियल सप्लायरांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. आज नाशिक शहरात दोन हजार, तर जिल्ह्यात चार हजारांच्या जवळ पास ट्रक आहेत. यांमधून बांधकामासाठी लागणाऱ्या वाळू, विटा, खडी व सिमेंट आदींची वाहतूक केली जाते. मात्र लॉकडाऊनच्या काळात या व्यवसायावर उतरती कळा आली आहे.

अनेक ट्रक मालक हे लाखो रुपयांचे बँक कर्ज घेऊन ट्रकचा व्यवसाय करत आहे. तसेच, कर्जावर घेतलेल्या ट्रकचा मासिक हप्ता हा ६० ते ७० हजार रुपये असतो, मात्र लोन भरण्यास तीन महिन्यांची मुदत दिली असली तरी हे हप्ते नंतर व्याजासह भरावे लागणार आहे. तसेच ट्रकला ७० ते ८० हजारांचा वार्षिक इन्शुरन्स असतो, अशात गेल्या दोन महिन्यांपासून ट्रकची चाके थांबली असून ट्रक मालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे या ट्रक व्यवसावर उपजीविका करणारे ड्राइव्हर, क्लिनर, मजूर यांची संख्या देखील हजारोंच्या घरात असून रोज हातावर पोट असलेल्या ह्या नागरिकांना कुटूंब कसे चलवायाचे असा प्रश्न पडला आहे.

दोन वर्षांपासून नाशिक, धुळे भागातील वाळू लिलाव बंद...

नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या बांधकामांना लागणाऱ्या वाळूचा लिलाव गेल्या दोन वर्षांपासून पासून होत नसल्याने, अनेक ट्रक मालक हे गुजरातहून नाशिकमध्ये वाळूची वाहतूक करत असतात. मात्र, यामुळे वाळूच्या किंमती देखील वाढत असल्याने, विक्रीच्या वेळी सदनिकांच्या किंमतीदेखील वाढत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील महसूलदेखील बुडत असल्याचं बिल्डिंग मटेरियल सप्लायर असोसिएशनचे म्हणणे आहे.

हेही वाचा : कोरोनामुळे आई अन् नवजात बाळाची ताटातूट.. व्हिडिओ कॉल करून माय-लेकराचा संपर्क, परिचारिका आईच्या भूमिकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.