ETV Bharat / state

भगूर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, २ महिन्यांनी वनविभागाला यश

गेल्या दोन महिन्यांनापासून भगूर परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. गावातील कुत्री आणि इतर जनावरांना बिबट्याने आपले भक्ष्य केल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. नागरिकांच्या मागणीवरून वन विभागाने अर्जुन कापसे यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला.

author img

By

Published : Nov 21, 2019, 6:25 PM IST

बिबट्या जेरबंद

नाशिक - भगूर परिसरातील मळे भागात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. या भागातील शेतकरी अर्जुन कापसे यांच्या शेतात मागील दोन महिन्यांपासून पिंजरा लावण्यात आला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

गेल्या दोन महिन्यांनापासून भगूर परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. गावातील कुत्री आणि इतर जनावरांना बिबट्याने आपले भक्ष्य केल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. नागरिकांच्या मागणीवरून वन विभागाने अर्जुन कापसे यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला. मात्र, दोन महिन्यात एकदाही पिंजरा लावलेल्या ठिकाणी बिबट्या फिरकला नाही.

हेही वाचा - दिंडोरीतील द्राक्षबागांचे नुकसान; शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची मागणी

अखेर गुरूवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या भागात बिबट्याच्या दहशतीमुळे सायंकाळी सात वाजल्यानंतर नागरिक घरातून बाहेर देखील पडत नव्हते. भगूरपासून काही अंतरावर असलेल्या देवळाली कॅम्प या लष्करी परिसरातही बिबट्याने अनेकांना दर्शन दिले. त्यामुळे या भागात आणखी बिबटे असावे, असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. देवळाली परिसरातही पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

Intro:भगूर भागात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद...

Body:नाशिकच्या भगूर परिसरातील मळे भागात लावलेल्या पिंजऱ्यात आज सकाळी बिबट्या जेरबंद झाला,या भागातील शेतकरी अर्जुन कापसे यांच्या शेतात गेल्या दोन महिन्यापासून पिंजरा लावण्यात आला होता,आज गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बिबट्या ह्यात जेरबंद झाल्याने परीसरात नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला....

गेल्या दोन महिन्यांन पासून भगूर परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता, या ठिकाणांच्या कुत्रे,जनावरांना बिबट्याने आपलं भक्ष केल्याने परिसरात भीतीचं वातावरण होतं,नागरिकांच्या मागणीवरून वन विभागाने अर्जुन कापसे यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता,मात्र गेल्या दोन महिन्यात एकदाही पिंजरा लावलेल्या ठिकाणी आला नाही आज अखेर सकाळी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला, त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला,ह्या भागात बिबट्याची दहशत इतकी होती की सायंकाळी सात वाजल्या नंतर कोणी घरातून बाहेर देखील पडतं नव्हतं. तसेच काही अंतरावर असलेल्या देवळाली कॅम्प ह्या लष्करी हद्द परिसरात बिबट्याने अनेक नागरिकांना दर्शन दिल्याने ह्या भागात आणखी बिबटे असावे असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे..ह्या भागात देखील पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे...

टीप फीड ftp
nsk leopard viu 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.