ETV Bharat / state

कोरोनाचा माणसांबरोबर जनावरांनाही फटका; गोशाळेतील जनावरांना मिळेना चारा

संपूर्ण देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे माणसांबरोबरच प्राण्यांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. नाशिक शहरात असलेल्या गोशाळेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात शंभरहून अधिक गोशाळा आहेत, त्यांना चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे.

कोरोनाचा माणसांबरोबर जनावरांनाही फटका; गोशाळेतील जनावरांना मिळेना चारा
author img

By

Published : Apr 15, 2020, 8:49 PM IST

नाशिक - कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसू लागला आहे. चाऱ्याचे भाव दुप्पट म्हणजे जवळपास साडेपाच हजार रुपये टन इतके झाल्याने नाशिकमधील गोशाळादेखील अडचणीत आल्या आहेत. सोबतच गोशाळा चालकांची परवड होत असून दानशूरांनीदेखील पाठ फिरवली आहे.

कोरोनाचा माणसांबरोबर जनावरांनाही फटका; गोशाळेतील जनावरांना मिळेना चारा

संपूर्ण देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे माणसांबरोबरच प्राण्यांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. नाशिक शहरात असलेल्या गोशाळेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात शंभरहून अधिक गोशाळा आहेत, त्यांना चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे जनावरांना जगवायचे कसे असा यक्षप्रश्न गोशाळा चालकांसमोर उभा ठाकला आहे.

लॉकडाऊनच्या काळात गावाकडून येणाऱ्या चाऱ्याची आवक मंदावली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे भाविक बाहेर येत नसल्याने चाऱ्याची मोठी वानवा झाली आहे. शहरात पालिकेसह खासगी १००हून अधिक गोशाळा आहेत. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने दानशूर व्यक्तींनी मदत करावी. सोबतच सरकारनेदेखील अनुदान देत जनावरांना जगविण्यासाठी मदत करावी, अशी मागणी गोशाळा चालकांकडून केली जाऊ लागली आहे. कोरोना संकटकाळात अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. माणूस आपल्या व्यथा मांडू शकतो मात्र प्राणी नाही. त्यांचेही आपल्याप्रमाणे जीवन संकटात आहे. त्यामुळे आता त्यांच्यासाठीही माणुसकी दाखविण्याची गरज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.