येवला (नाशिक) - मकरसंक्रांत हा सण येवल्यात पतंग उडवून साजरा केला जातो. संक्रांतीनिमित्त तीन दिवस शहरात पतंग उडविले जातात. भोगीच्या दिवसापासून या पतंगोत्सवाला सुरुवात होते.
पतंगबाजीचा मनमुराद आनंद
पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पतंगमय झाले आहे. पतंगोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील बालकांपासून युवक-युवती, पुरुष-महिला व वृद्धही पतंग उडवितात. यावेळी सर्वजण पतंगोत्सवाचा आनंद घेत असताता.
पतंगाने आकाश झाले सप्तरंगी
दिवसभर रंगीबेरंगी पतंगांनी आकाश जणूकाही सप्तरंगी झाल्याचे दिसत होते.नववर्षाच्या प्रारंभी येणारा पतंगोत्सव भोगी, संक्रांत आणि करी दिनाच्या दिवशी येवलेकर मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
हेही वाचा - नाशिक-मुंबई महामार्गावर खासगी बसला आग; बस जळून खाक
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात पोहोचली कोविड लस