ETV Bharat / state

नात्यातील व्यक्तीकडून सख्ख्या बहिणींचे अपहरण, दोन कोटींची मागणी - नाशिक क्राईम बातमी

नात्यातीलच एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींना आमिष दाखवून पळवू नेले. त्यानंतर मुलींच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, मुलींच्या वडिलांनी हा प्रकार येवला तालुका पोलीस ठाण्यात सांगितला.

kidnapped-two-sisters-and-demands-of-two-crore-in-nashik
सख्ख्या बहिणींचे अपहण करुण दोन कोटींची मागणी...
author img

By

Published : Mar 10, 2020, 5:42 PM IST

नाशिक- येवला तालुक्यातील गुजरखेडे गावातील दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचे नात्यातीलच तरुणाने अपहरण केले. त्यानंतर मुलींच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, पोलिसांनी त्या मुलींची सुखरूप सुटका केली आहे.

सख्ख्या बहिणींचे अपहण करुण दोन कोटींची मागणी...

हेही वाचा- जगभरात कोरोनामुळे ४ हजार जणांचा मृत्यू; चीनबाहेर २८ हजार नागरिकांना लागण

नात्यातीलच एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींना आमिष दाखवून पळवू नेले. त्यानंतर मुलींच्या वडिलांकडे दोन कोटींची मागणी केली. मात्र, मुलींच्या वडिलांनी हा प्रकार येवला तालुका पोलीस ठाण्यात सांगितला. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी तत्काळ तपास सुरू केला.

अपहरणकर्त्यांनी ज्या मोबाईलवरून फोन केला तो क्रमांक पोलिसांनी ट्रेस केला. तो कोपरगाव तसेच शिर्डी परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी त्वरित सापळा रचला आणि दोन्ही बहिणींची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. अवघ्या सहा तासाच्या आत पोलिसांनी हा तपास केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.