ETV Bharat / state

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर - Savitribais

Satyashodhak Film : समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Satyashodhak Film
सत्यशोधक चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 10:28 PM IST

नाशिक Satyashodhak Film : समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य ‘सत्यशोधक’ हा चित्रपट नवीन वर्षात रिलीज होत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या टिझरमुळे आणि म. ज्योतिराव-सावित्रीबाई यांच्या लुकमुळं चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. आता हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नाशिक भेटीदरम्यान सत्यशोधक चित्रपटाच्या टिमने नाशिककरांशी संवाद साधला.

‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस : आज समाजातील महिला वेगवेगळ्या उच्च पदांवर बेधडकपणे काम करतात. याचं सर्व श्रेय क्रांतीज्योती ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांनाच जातं. त्यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात ज्योतिरावांच्या भूमिकेत अभिनेते संदिप कुलकर्णी दिसतील, तर सावित्रीमाईंच्या भूमिकेत अभिनेत्री राजश्री देशपांडे दिसणार आहे. या दोघांच्या हुबेहुब लुकमुळं प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी, अनिकेत केळकर, अमोल बावडेकर, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील.

हे आहेत कलाकार : समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित, संकल्पना - राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत. तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मितीमध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे, निता गवई आणि डॉ. जगदीश वाणखडे यांचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. Death Anniversary Of Mahatma Jotirao Phule : महात्मा जोतीराव फुलेंच्या तैल चित्राचे झाले अनावरण, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले
  2. सोशल डिस्टन्स ठेवत साजरी झाली महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती
  3. Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna : शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची मदत मिळणार ऑनलाईन

प्रतिक्रिया देताना अभिनेता संदीप कुलकर्णी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.