ETV Bharat / state

नाशिकच्या भाजप कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी 'जागरण-गोंधळ'

author img

By

Published : Oct 2, 2020, 3:03 PM IST

Updated : Oct 2, 2020, 3:12 PM IST

मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आरक्षणासाठी सरकारवर दबाव टाकावा, या मागणीसाठी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी जागरण-गोंधळ घालत लक्ष वेधले.

नाशिक
नाशिक

नाशिक - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी वसंतस्मृती या भाजप कार्यालयाबाहेर 'जागरण-गोंधळ आंदोलन' केले. भाजप हा राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असून मराठा आरक्षण मार्गी लावण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर दबाव टाकावा, अशी मागणी आंदोलकांनी करत जोरदार घोषणाबाजी केली.

नाशिकमध्ये मराठा आरक्षणासाठी 'जागरण-गोंधळ'

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस जटील होत असून बीड जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यामुळे मराठा समाजात संतापाची लाट आहे. मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आरक्षणासाठी सरकारवर दबाव टाकावा या मागणीसाठी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी जागरण-गोंधळ घालत लक्ष वेधले. मराठा समाजात संतापाची लाट आहे. राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे. राज्य सरकारातील तिन्ही पक्ष आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने एकत्र येत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच केंद्रात भाजपचे सरकार आहे. भाजप लोकप्रतिनिधिंनी केंद्रापर्यंत हा मुद्दा पोहचवावा. केंद्र व राज्य या दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलकांना नोटिसा

पोलीस प्रशासनाला माहिती देऊनही त्यांनी आम्हाला नोटिसा धाडल्या, असा आरोप करत राज्य शासनाच्या मुस्कटदाबीला आम्ही जुमानणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. पोलिसांनी सकाळी ऐनवेळी नोटीस धाडली. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. तरी देखील नोटीस देऊन त्रास दिला जात असेल तर यापुढे गनिमी काव्याने आंदोलने केली जातील, असा इशारा आंदोलकांनी देत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले...

हेही वाचा - कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण; आतापर्यंत २००६ रुग्ण कोरोनामुक्त

Last Updated : Oct 2, 2020, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.