नाशिक - कोरोना संसर्गामुळे एखाद्या स्वस्त धान्य दुकानदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले जाईल. तसेच, मोफत तांदळाचेही कमीशन लवकरच दिले जाईल असे आश्वासन वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले. यानंतर 1 जूनपासून सुरू करण्यात आलेला रेशन दुकानदारांचा संप मिटला असून राज्यातील रेशन दुकाने पूर्ववत सुरू झाली आहे.
कोरोना काळात आपले कर्तव्य बजावताना आरोग्य कर्मचारी, पोलिसांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याला राज्य सरकारने 50 लाखांचे विमा कवच दिले आहे. ह्याच धर्तीवर राज्यातील रेशन दुकानदारांनाही हे संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. हे दुकानदारही आपला जीव धोक्यात घालून गरजू नागरिकांना अन्न-धान्य पुरवठा करत आहेत. तेही रोज अनेक नागरिकांच्या संपर्कात येतात. अशात दुर्दैवाने कुठल्या दुकानदाराला कोरोनाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा. यासाठी सरकारने 50 विमा कवच द्यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील रेशन दुकानदारांनी 1 जूनला संप पुकारला होता..
यावर तोडगा काढण्यासाठी विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पुढाकार घेत वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. या वेळी, ‘सध्याची कोरोनाची गंभीर परिस्थिती पहाता दुकानदारांनी संप करणे योग्य नाही. एखाद्या दुकानदाराचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाखांचे विमा संरक्षण कवच दिले जाईल. तसेच, मोफत धान्य वाटपाचे कमीशनही दुकानदारांना अदा करण्यात येईल. शासन धान्य दुकानदारांबाबत सकारात्मक असून दुकानदारांनीही आपले काम चोख बजावावे. दुकानदारांनी तातडीने संप मागे घेऊन कार्डधारकांना मालाचे वाटप सुरु करावे,’ असेही पवार म्हणाले. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर रेशन दुकानदारांनी संप मागे घेत आजपासून धान्य वाटपास सुरवात केली.
रेशन दुकानदारांचा संप मिटला, कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्यास 50 लाखांचे विमा कवच - minister ajit pawar news
कोरोना काळात आपले कर्तव्य बजावताना आरोग्य कर्मचारी, पोलिसांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याला राज्य सरकारने 50 लाखांचे विमा कवच दिले आहे. ह्याच धर्तीवर राज्यातील रेशन दुकानदारांनाही हे संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. वित्तमंत्री अजित पवार यांनी ही मागणी मान्य केली.