नाशिक - इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेत्री हिना पांचाळसह अन्य 25 जणांच्या पोलीस कोठडीत 5 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या बंगल्याच्या मालकाला देखील पोलिसांनी अटक केली आहे. अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घागरे-वालावलकर यांनी ही पार्टी उधळून लावल्यामुळे हा डाव फसला आहे.
फरार ताज स्काय व्हीला मालक रणवीर सोनी पोलिसांच्या ताब्यात
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातील ताज स्काय व्हीला या बंगल्यांमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्य, ड्रग्स, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. या ठिकाणी अभिनेत्री हिना पांचाळ तिच्यासह एक इराणी कोरियोग्राफर महिला व चार दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह बारा महिला व तेरा पुरुषांना पोलिसांनी सोमवारी (दि. 28 जून) न्यायालयात हजर केले होते. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांना मंगळवारी (दि. 29 जून) न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत 5 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ज्याठिकाणी पार्टी सुरू होती त्या बंगल्याच्या मालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन चर्चेत
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातील बंगल्यांमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरत विदेशी मद्यासह ड्रग्ज, कोकेन, चरस, हुक्का यासारखे अंमली पदार्थही पोलिसांच्या हाती लागल्याने बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
हेही वाचा - इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : 'बिग बॉस'फेम हिनासह 12 तरुणींना पोलीस कोठडी