ETV Bharat / state

नाशिकमधील निर्बंध शिथीलतेबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार - पालकमंत्री छगन भुजबळ

विकेण्ड लाॅकडाऊनमध्ये दोन पैकी एका दिवशी दुकाने सुरु ठेवण्याची मुभा द्यावी, यासह विविध मुद्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीती बैठक झाली.

author img

By

Published : Jul 23, 2021, 10:54 PM IST

छगन भुजबळ ताज्या बातम्या
छगन भुजबळ ताज्या बातम्या

नाशिक - सोमवार ते शुक्रवार दुकानांची मर्यादा दुपारी चार ऐवजी एक तासाने वाढवून पाच वाजेपर्यंत करावी. तसेच विकेण्ड लाॅकडाऊनमध्ये दोन पैकी एका दिवशी दुकाने सुरु ठेवण्याची मुभा द्यावी, यासह विविध मुद्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीती बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणार असून मुख्यमंत्री व टास्कफोर्स याबाबत अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती माहिती दिली. तसेच सद्यस्थितीत तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया

'जिल्ह्यात चित्रीकरणाला परवानगी' -

मुंबईपासून नाशिक जिल्हा जवळ असल्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे चित्रीकरण केले जाते. त्यामुळे जिल्ह्यात चित्रीकरणाला नियम व अटीसंह परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चित्रीकरणाला बहार येऊन रोजगार निर्मिती व अर्थकारणाला चालना मिळेल, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत वायुसेनेची भरती होणार असून त्यासाठी अडीच हजार उमेदवार नाशिकमध्ये येणार आहेत. लष्काराने त्यासाठी जिल्हाप्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली होती, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. यापुढे देखील लष्कराच्या भरतीला परवानगी दिली जाईल. मात्र, सुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात ३३५ शाळा सुरु असून त्यात कोणतीही अडचण आली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत १ हजार ४२८ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण कमी होण्याची गती संथ असल्याचे त्यांनी सांगितले.

'३१ ऑगस्टपर्यंत ऑक्सिजन क्षमतेची पूर्तता' -

दुसर्‍या लाटेत जिल्ह्याला १३७ मेट्रिक टन ऑक्सिजन दिवसाला लागत होता. ते बघता तिसर्‍या लाटेसाठी जिल्ह्याला ४०० मेट्रीक टन ऑक्सिजन पूर्ततेचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यादृष्टीने जिल्ह्या प्रशासनाने तयारी सुरु केली असून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत ऑक्सिजन निर्मितीचे हे उदिष्ट पूर्ण केले जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले. मागील एक ते दिड महिन्यात जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर कमी होत असून तो सद्यस्थितीत २.३ टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साधारण १७ लाख १५ हजार ८५८ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच म्यूकर मायकोसीसचे ६७ रुग्ण उपचार घेत असून गेल्या आठवड्यात एकही रुग्ण बाधित झालेला नाही.

हेही वाचा - राज्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, दुर्घनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.