ETV Bharat / state

पेपर अवघड गेल्याने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या...

राज्यात सध्या बारावीची परिक्षा सुरू आहे. नाशिकमध्ये एका विद्यार्थिनीने रसायनशास्त्र विषयाचा पेपर अवघड गेल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

विद्यार्थीनीची आत्महत्या सटाणा महाविद्यालय नाशिक
विद्यार्थीनीची आत्महत्या
author img

By

Published : Feb 27, 2020, 3:26 PM IST

नाशिक - रसायनशास्त्र विषयाचा पेपर अवघड गेल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. सटाणा महाविद्यालयात बारावीला विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा... 'भाजपचा सावरकर पुळका खोटा, राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर'

ताहाराबाद येथील संस्कृती दिनेश पगार या विद्यार्थिनीने बुधवारी रसायनशास्त्र विषयाचा पेपर दिला. पेपर दिल्यानंतर दुपारी ती सटाण्याहुन ताहराबादला घरी परतली. घरी परतल्यानंतर घरात कोणीही नसताना तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घराजवळ असलेल्या एका कार्यक्रमासाठी गेलेली तिची आई घरी आली. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद होता. तिला आवाज देऊनही तिने दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. रसायनशास्त्र विषयाचा पेपर अवघड गेल्याने तीने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. तसेच या घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.