नाशिक - येवला शहरासह तालुक्यातील नगरसुल, रेंडाळे, सायगाव, हडपसावरगाव, अंदरसुल यासह ग्रामीण भागातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पाऊसाने झोडपले असून अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. या वादळाने अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडाले असून काही झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
चाळीत साठवलेला कांदा भिजला -
मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात साठवला होता. तर काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, वाऱ्याच्या वेग जास्त असल्याने पावसामुळे नगरसूल येथे चाळीत साठवलेला कांदादेखील भिजला गेला आहे. दरम्यान, शहरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बच्चे कंपनीने या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.
हेही वाचा - शाब्बास रे पठ्ठ्या..! आदिवासी तरुणाला गुळवेल पुरविण्याचे १.५ कोटींचे मिळाले कंत्राट