ETV Bharat / state

नाशकात पावसाची जोरदार हजेरी; मात्र जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये फक्त ३० टक्केच पाणी

पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरात पुन्हा एकदा गुडघाभर पाणी साचले होते. अनेक वाहने पाण्याखाली गेली होती. गौतमी, ब्राम्हगिरी डोंगरावरून येणारे पाणी तसेच शहरात पाण्याचा निचरा होण्यास योग्य नियोजन नसल्याने त्र्यंबकेश्वर शहर जलमय झाले होते.

नाशिकात जोरदार पाऊस
author img

By

Published : Jul 27, 2019, 9:52 AM IST

नाशिक- शहरामध्ये पावसाने उघडीप घेतली असली तरी जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ सुरगाणा आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, जोरदार पावसामुळे वाहतुकीला फटका बसला आहे.

जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसादरम्यानची छायाचित्रे

पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरात पुन्हा एकदा गुडघाभर पाणी साचले होते. अनेक वाहने पाण्याखाली गेली होती. गौतमी, ब्रम्हगिरी डोंगरावरून येणारे पाणी तसेच शहरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने त्र्यंबकेश्वर शहर जलमय झाले होते. यामुळे काही वेळासाठी भाविकांची तारांबळ उडाली होती. त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. मात्र या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या भागात भाताची शेती होत असल्याने सुरू असलेला पाऊस शेतीसाठी अनुकूल असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने धरणे देखील चांगल्या प्रमाणत भरली आहेत. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ६१ टक्के भरले आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये केवळ ३० टक्केच पाणी साठा उपलब्ध असून जिल्ह्यात अजून दमदार पावसाची आवश्यकता आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस..

Body:नाशिक मध्ये पावसाने उघडीप घेतली असली तरी जिल्ह्यातील अनेक भागात काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाला,नाशिक शहरा सह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ सुरगाणा आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली,

पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरात पुन्हा एकदा गुडघाभर पाणी साचले होते अनेक वाहन पाण्याखाली गेली होती,गौतमी,ब्राम्हगिरी डोंगरावरून येणार पाणी आणि त्र्यंबकेश्वर शहरात पाण्याचा निचरा होण्यास योग्य नियोजन नसल्याने त्र्यंबकेश्वर शहर जलमय झालं होतं.ह्यामुळे काही वेळा साठी भाविकांची देखील तारांबळ उडाली, इगतपुरी तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे,ह्या भागात भाताची शेती होत असल्याने होणार पाऊस शेतीसाठी अनुकूल असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे..नाशिक मध्ये होतं असलेल्या पावसाने धरणं देखील चांगल्या प्रमाणत भरली आहेत,नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणं 61 टक्के भरले असलं तरी जिल्ह्यातील 24 धरणां मध्ये केवळ 30 टक्के पाणी साठा असून नाशिक जिल्ह्यात अजून दमदार पावसाची आवश्यकता आहे..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.